आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छतागृह बांधकाम खर्चात दिसतेय प्रचंड मोठी तफावत, स्वच्छभारत अभियानाला दलालरूपी मुंगळे?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फॉरेस्ट परिसरातील नाल्यालगत चार सिटच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचे बांधकाम सुरू आहे. - Divya Marathi
फॉरेस्ट परिसरातील नाल्यालगत चार सिटच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचे बांधकाम सुरू आहे.
सोलापूर - स्वच्छ भारत मिशन योजनेतून हागणदारीमुक्त शहर करण्यासाठी केंद्र शासनाने घर तेथे शौचालय अभियान हाती घेतले. यात वैयक्तिक स्वच्छतागृह बांधण्यासाठी १५ हजार रुपये खर्च गृहीत धरून तेवढीच रक्कम अनुदानात दिली जात आहे. 
 
तर दुसरीकडे सार्वजनिक स्वच्छतागृह बांधकामास मात्र मक्तेदारास ८५ हजार रुपये मोजले जात आहेत. यावरून योजनेला दलालरूपी मुंगळे लागल्याचा संशय बळावतो अाहे. 
निविदेला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून ११० सीटच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या बांधकामाचा मक्ता ३७/३ विनाटेंडर दिला. ११० आणि ३४ असे एकूण १४४ सीटच्या स्वच्छतागृहाच्या बांधकामाचा मक्ता अतुल गायकवाड यांना दिला. 
 
अशी वाढली रक्कम 
एका सीटचे स्वच्छतागृह बांधण्यासाठी शासनाने ५२ हजार रुपये दर निश्चित केला अाहे. मनपा प्रशासनाने त्यासाठी ८५ हजार ९७० रुपये लागतात असे सांगितले. स्थायी समितीने ते मंजूर केले. १४४ सीटच्या स्वच्छतागृहासाठी एक कोटी २३ लाख ७९ हजार ६८० रुपये खर्च आला. दुसऱ्या टप्प्यात १११ सीटच्या स्वच्छतागृहाचे बांधकाम सुरू झाले. त्यातच बोअर मारून हातपंप बसवण्याचे शासनाच्या सूचनाआणि महापालिकेने मक्तेदाराशी केलेला करार पाहून घेतो. मोठी तफावत असेल तर शिवसेना जनतेच्या पैशाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी तक्रार करून भ्रष्टाचारास जबाबदार असलेल्या प्रत्येकावर कारवाईसाठी पाठपुरावा करेल.” महेश कोठे, विरोधी पक्षनेते 
 
-पारदर्शी कामाचा बाऊ करणारेच भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहेत. सभागृहात हा मुद्दा उपस्थित करून भ्रष्टाचार थांबवू. आमदार प्रणिती शिंदे यांच्यामार्फत विधानसभेत हा मुद्दा मांडून सरकारचे लक्ष वेधू.” चेतन नरोटे, कॉँग्रेस गटनेते
 
-सध्याच्या प्रचलित दरानुसारच सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम होत आहे. शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन केले जात आहे. लक्ष्मणचलवादी, नगर अभियंता, महापालिक कामसुद्धा आहे. त्यासाठी २० हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 
 
बांधकामाचा तपशील असा 
बायफूट आकाराचे शौचालय बांधकाम, आतून-बाहेरून प्लास्टर, पीयूसी दरवाजा, स्लॅब, तीन फुटापर्यंत टाईल्स, सुरक्षा भिंत, दोन हजार लिटर पाण्याची टाकी, ड्रेनेज कनेक्शन जोड, रंगरंगोटी. यामध्ये नऊ इंचची भिंत बांधकाम, स्लॅब टाकताना सहा बाय, सहाचा गाळा ठेवून स्टील सळईचा सांगाडा करण्याची सूचना आहे. 
 
प्रत्यक्ष खर्चाचे गणित असे 
विटांचा खर्च १८हजार, स्लॅब खर्च २१ हजार रुपये, पीयूसी दरवाजा १० हजार रुपये, पायासाठी ३,५०० रुपये, टाईल्स हजार, सिमेंट ७,५०० रुपये, वाळूचे ६,५०० रुपये, प्लास्टर खर्च हजार रुपये, कमोडसाठी हजार, पाणी टाकीला ६, ५०० रुपये, ड्रेनेज जोडणी २,५०० रुपये, रंगरंगोटी २,५०० रुपये. असे चार सीटच्या स्वच्छतागृहाच्या बाधकामास एकूण ९५,००० रुपये खर्च. मनपा मोजते चार सीटसाठी लाख ४० हजार रुपये. 
 
व्यावसायिक म्हणतात, खर्च २० हजार 
तीन बाय चार आकाराचे प्रतिसीट अाहे. चार सीटच्या शौचालयास प्रत्येकी २० हजार रुपयांप्रमाणे ८० हजार रुपये लागतात, असा दावा सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंता संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसले आणि माउली पवार यांना केला अाहे. 
बातम्या आणखी आहेत...