आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर आंतरराष्ट्रीय विमानतळ नऊ वर्षे झाली तरीही कागदावरच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी, नवीन उद्योग येण्यासाठी बोरामणी येथे नवीन विमानतळाची घोषणा नऊ वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली. मात्र आजपर्यंत विमानतळ कागदावरच राहिले आहे. निर्वनीकरण आणि तिसऱ्या टप्प्यातील संपादनामुळे २०१४ मध्ये विमानतळाचे भूमिपूजन होता होता राहिले. त्यानंतर केंद्र राज्यात सत्ता बदल झाल्याने काँग्रेस सरकारचा प्रकल्प म्हणून बोरामणी विमानतळास राज्य शासनाने दुर्लक्षित केल्याचे दिसते. 

दरम्यान, याबाबत विचारले असता, विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी सांगितले की, होटगी विमानतळाचा िवकास करणे, ते सुरू करणे आणि त्याला कसा प्रतिसाद मिळतो, यावरून बोरामणी विमानळाचा विकास करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. 

बोरामणी विमानतळास राज्य शासनाने १३ जून २००८ रोजी मंजुरी देत हे विमानतळ ग्रीनफिल्ड एअरपोर्ट म्हणून विकसित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. सध्या विमानतळाकडे बाेरामणी तांदूळवाडी येथील ५४९.३४ हेक्टर जमीन संपादित करून कंपनीच्या ताब्यात दिली आहे. यानंतर राज्य शासनाने २१ ऑगस्ट २०१३ रोजी संयुक्त कंपनी स्थापन करून विमानतळ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्यात करार झाला. ३१.८९ हेक्टर जमीन वनविभागाची आहे. निर्वनीकरणाचा प्रस्ताव नागपूर कार्यालयाकडे पाठविण्यात आला. तिसऱ्या टप्प्यात ३० हेक्टर जमीन संपादन करण्याचा प्रस्ताव प्रांतकार्यालयाकडे आहे. शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास नकार दिला. खासगी वाटाघाटीने जमिनी घेण्याबाबत प्रांत कार्यालयाने विमानतळ विकास कंपनीस पत्रव्यवहार केला आहे, त्याला अद्याप उत्तर दिले नाही. 

१२ विभागांची परवानगी 
विमानतळउभारणीसाठी १२ विभागाची परवानगी लागणार आहे, यापैकी भारतीय विमानतळ प्राधिकरण संरक्षण मंत्रालय या दोन विभागाची परवानगी विमानतळास मिळाली आहे. उर्वरित पर्यावरण विभाग, गृहमंत्रालय, जलसिंचन विभाग, एमएसईटीसीएल, एमएसईडीसीएल, एचएएल, डीजीसीए, बीसीएएस या विभागांकडे परवानगी मागण्यात येणार आहे. याशिवाय एएआय, आयएमडी, कस्टम, इमिग्रेशन या विभागांशी करार करण्यात येणार असल्याचे विमानतळ विकास कंपनीने स्पष्ट केले. 

विमानतळाचा मास्टर प्लॅन तयार
विमानतळविकास कंपनीने संकेतस्थळावर बोरामणी विमानतळाची सद्यस्थितीची माहिती दिली आहे. एएआयने बोरामणी विमानतळाचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. हे विमानतळ डी चे असेल आणि एटीआर ७२/५०० आणि एअरबस ३२० प्रकारचे विमान उड्डाण करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात २५०० बाय ४५ मीटर तर दुस ऱ्या टप्प्यात ३३०० बाय ४५ मीटरचा रनवे असणार आहे. मुख्य इमारत हजार ८०० चौ. मीटरची राहील. याबरोबरच गरजेनुसार इतर इमारतींची उभारणी करण्यात येणार आहे.
 
प्रतिसाद पाहून निर्णय घेण्यात येईल 
होटगीरस्त्यावरीलविमानतळ सुरू करणे यास राज्य शासनाकडून प्राधान्य दिले आहे. या विमानतळावरून प्रवासी वाहतुकीस मिळणारा प्रतिसाद पाहून बोरामणी विमानतळाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. निर्वनीकरण तिसऱ्या टप्प्यातील संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. बोरामणीचे नियोजित िवमानतळ मोठे असून त्याठिकाणाहून कार्गो प्रवासी वाहतूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवासी संख्या आवश्यक आहे. यामुळे होटगी रस्त्यावरील विमानतळास प्रतिसाद पाहून निर्णय होईल.” - सुरेश काकाणी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक एमएडीसी 
बातम्या आणखी आहेत...