आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 10 फेब्रुवारीपासून, जगभरातील सिनेमे पाहण्याची संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - येत्या१० ते १२ फेब्रुवारीदरम्यान सोलापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे. प्रिसिजन फाउंंडेशन आणि पुणे फिल्म फाउंंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन केले आहे. उमामंदिर येथे ६.२५ वाजता मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती प्रिसिजनच्या संचालिका सुहासिनी शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

सिनेसृष्टीतील भरीव योगदान देणाऱ्या एका मान्यवराला जीवनगौरव पुरस्काराने देण्यात येणार आहे. त्यानंतर बरखा मिट्स बरखा हा चित्रपट दाखविण्यात येईल. ११ आणि १२ फेब्रुवारीमध्ये भागवत, उमामंदिर आणि प्रभात टॉकीज या दोन चित्रपटगृहामध्ये महोत्सव पार पडेल. 

महोत्सवात एकूण २१ चित्रपट दाखवले जाणार आहेत. भारतासह बेल्जियम, फ्रान्स, जॉर्जिया, दक्षिण आफ्रिका, चीन युनाटेड किग्डम , ऑस्ट्रीया, अमेरिका , पोलंड, रशिया, झेक रिपब्लिकन, स्लेावाकिया, जर्मनी, ईटली, कॅनडा, टर्की, सौदी अरेबिया, इन्टोनिया, फिलीपाइन्स, क्रोएशिया आदी देशांमधील कलाकृतींचा समावेश आहे. 

भागवत,उमामंदिरमध्ये उद्घाटनाचा चित्रपट: संध्याकाळी ७.३० वाजता मोहममद सब्बाघ दिग्दर्शित बरखा मिट्स बरखा हा चित्रपट ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.१५ वाजता पेरेकोन्नवल्लेड इस्टोनियाचा चित्रपट असणार आहे. दुपारी १२ ३० वाजता पौ सो यू चेंयाग दिग्दर्शित मंकी किंग हिरो ईज बॅक, २.३० वाजता लॉट हा लुई ईग्नेस्यू दिग्दर्शित चित्रपट सादर होणार आहे. ४.३० वाजता पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित उबुंटू हा चित्रपट सादर होणार आहे. सायंकाळी वाजता नदी वाहते हा संदीप सावंत यांचा चित्रपट सादर होणार आहे. १२ फेब्रुवारी : १०.१५ वाजता मॉन्स्टर हंट दिग्दर्शित रामन हुई, वाजता डिसमे दिग्दर्शन जोयल लमानगन, वाजता हरिकथा प्रसंग दिग्दर्शित अन्यया कासरवल्ली, ५.१५ वाजता अण्णा दिग्दर्शित जॉकक्वेस टॅावलेमुंडे, ७.१५ वाजता लेडी ऑफ लेक दिग्दर्शित होबाम पवनकुमार हे चित्रपट सादर होणार आहेत. 

प्रभात चित्रपटगृह: ११ फेब्रुवारी २०१७ : १०.३० वाजता स्टुडंट्स अॅनिमेशन काम्प, दुपारी वाजता स्टुडंस लाइव्ह अॅक्शन काम्प १, दुपारी ३.३० वाजता स्टुडंट्स लाइव्ह अॅक्शन काम्प या विद्यार्थांनी तयार केलेल्या शाॅर्ट फिल्म सादर होणार आहेत. ५.४५ वाजता मॅन ऑन वाईरी दिग्दर्शित जेम्स मार्स, ७.३० वाजता मनी ऑन रोड दिग्दर्शन एईजसेलिंग अबुदुकेलाईम, मुलती एम अॅण्ड झू जेन आदी चित्रपट सादर होणार आहेत. 

१२ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता बेबीलान सिस्टर दिग्ददर्शन बेबीलान सिस्टर, १२.३० वाजता डॅन दिग्दर्शन लैला पुकालेनन, २.३० वाजता विनर दिग्दर्शन सुनिकेत गांधी, ४.४५ वाजता रिव्होलेशन दिग्दर्शन विजया जयपाल, वाजता टोजबेजी दिग्दर्शन ऑव्हझेर्टक आदी चित्रपटाचे सादरीकरण होणार आहे. 

चित्रपट महोत्सवाची नाव नोंदणी 
महोत्सवाचा लाभ १८ वर्षे वयापुढील रसिकांनाच घेता येणार आहे. भागवत मंदिर, प्रभात टॉकीज, एसके कॉम्प्युटर्स, इंप्रेशन आणि कॉटनकिंग, प्रीती केटरर्स, विद्या कॉम्प्युटर, फिश मार्केट या ठिकाणी नाव नोंदणी करता येईल. 
बातम्या आणखी आहेत...