आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य पेंट्याक्यू स्पर्धा - सोलापूर जिल्हा पुरुष महिला दोन्ही संघाची विजयी सलामी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राज्यपेंट्याक्यू स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याच्या पुरुष महिला संघाने विजयी सलामी दिली. येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर रविवारी सुरू झालेल्या या स्पर्धेत पुरुष संघाने पुण्याचा ११-७ असा पराभव केला. सोलापूरकडून महेश मुळे, राकेश डांगे यांनी तर पुण्याकडून सुमीत क्षीरसागर, प्रवीण परवेळकर यांनी उल्लेखनीय खेळी केली.
महिलाच्या स्पर्धा साखळी पद्धतीने सुरू आहे. ठाणे संघावर ११-८ असा विजय मिळविल्यानंतर दुसऱ्या सामन्यात सोलापूरला पुण्याने हरविले. सोलापूरकडून भाग्श्री , चंद्रिका श्रीराम, रुक्मीनी गाठे, स्वामी पल्लवी तर ठाणेकडून राणी मडके, रोहित निपुरते हे चमकले.

महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस जिल्हा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजिली आहे. स्पर्धेचे उद्घाटन धर्मा भोसले यांनी केले. यावेळी जिल्हा क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष ए. डी. चिनीवार, राज्य संघटनेचे तांत्रिक समिती प्रमुख सुरेश गांधी, सेवादलचे अध्यक्ष अशोक कलशेट्टी आदी उपस्थित होते. संतोष खेंडे यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी वसपटे यांनी आभार मानले.
बातम्या आणखी आहेत...