आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर-मिरज पॅसेंजर आता एक्स्प्रेस म्हणून धावणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गेल्या काही महिन्यांपासून सोलापूरकरांच्या सेवेत धावणाऱ्या सोलापूर-मिरज पॅसेंजरला रेल्वे बोर्डाने एक्स्प्रेसचा दर्जा दिला आहे. तसेच या गाडीला कायम करण्यात आले आहे. पॅसेंजरला एक्स्प्रेसचा दर्जा मिळणार असल्याने पूर्वीच्या वेळेत बदल होणार आहे. वेळेचा बदल कधीपासून होणार हे अद्याप स्पष्ट नसले तरीही येत्या ऑक्टोबरपासून रेल्वेच्या नूतन वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे आॅक्टोबरपासून वेळेत बदल होण्याची शक्यता आहे.
सोलापूर -मिरज पॅसेंजर ही गाडी तात्पुरती स्वरुपात सुरू करण्यात आली होती. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने गाडीला वारंवार मुदतवाढ देण्यात आली. सोलापूर विभागाच्या ऑपरेटिंग विभागाने गाडीला नियमित करावे तसेच गाडीस एक्स्प्रेसचा दर्जा द्यावा, असा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला होता. त्यास रेल्वे बोर्डाने होकार देऊन तसा आदेश सोलापूर विभागाला दिला. गाडीला नवीन क्रमांकही मिळाला आहे. सोलापूरहून मिरजला जाण्यासाठी ११३१० तर मिरजहून सोलापूरला येण्यासाठी ११३०९ हा क्रमांक दिला आहे. गाडीला एकूण १२ डबे जोडले जाणार आहेत. यात एक वातानुकूलित डबा असणार आहे. सध्या ही गाडी सोलापूर स्थानकावरून दररोज सकाळी वाजता सुटते. मिरजला दुपारी १२.१५ वाजता पोहोचते. मिरजहून दुपारी ३.३५ वाजता निघते. सोलापूरला रात्री ९.१५ वाजता पोहोचते. आता वेळेत तिकीट दरात होणार आहे.
^ रेल्वेबोर्डाने सोलापूर-मिरज पॅसेंजरला एक्स्प्रेसचा दर्जा दिला आहे. सोलापूरकरांसाठी ही चांगली बातमी आहे. अद्याप गाडीची वेळ कोणती असावी हे ठरले नाही. लवकरच ती ठरविली जाईल. पी.एस. पुन्नूस, विभागीय परिचालन व्यवस्थापक, सोलापूर
बातम्या आणखी आहेत...