आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर- मिरज पॅसेंजर उद्यापासून धावणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूरहून मिरज कोल्हापूरसाठी सकाळच्या वेळी एखादी रेल्वे सुरू करण्याची प्रवाशांची मागणी पूर्ण होत असून येत्या गुरुवारपासून सोलापूर -मिरज - सोलापूर पॅसेंजर(गाडी क्र-०१४१३/१४) दररोज धावणार आहे. या गाडीस प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला तर ती नियमितपणे तसेच इंटरसिटी म्हणून धावण्याची शक्यता आहे. १८ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत ही विशेष रेल्वे धावणार आहे. गाडीची वेळ सकाळची असल्याने पंढरपूर, सांगोला येथे जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.
सोलापूरहून सकाळी सहा वाजता ही गाडी सोलापूर रेल्वे स्थानकावरून सुटेल. कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला मार्गे ही गाडी मिरज येथे दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी पोहचेल. तसेच मिरज येथून दररोज दुपारी वाजून ३५ मिनिटांनी निघेल. सोलापूरला रात्री वाजून १० मिनिटांनी पोहचेल. मुंबईहून रेक उपलब्ध झाल्याने ही गाडी सुरू करण्यात आली आहे. या गाडीला १२ डबे असतील.

असे असतील थांबा
मोहोळ, माढा, कुर्डुवाडी, मोडनिंब, पंढरपूर, सांगोला, जतरोड, ढालगाव, कवठे महांकाळ, सलगरे, अरग आदी स्थानकांवर थांबा आहे.

सोलापूर -मिरज मार्गावर दुसरी गाडी
पूर्वी सकाळी साडेआठच्या सुमारास सोलापूर स्थानकावरून सोलापूर -कोल्हापूर एक्सप्रेस सोडण्यात येत होती. गाडीस चांगला प्रतिसाद लाभत नसल्याने ही गाडी सकाळी एेवजी रात्री साडेअकराच्या सुमारास सोलापूरहून कोल्हापूरसाठी सोडण्यात येते. सकाळची गाडी रद्द झाल्याने कुर्डुवाडी, पंढरपूरसाठी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत होती. आता या नव्या गाडीमुळे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.

प्रवाशांच्या मागणीमुळे निर्णय
^प्रवाशांच्या मागणी नंतरगाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांचा प्रतिसाद लाभला तर गाडी नियमित केली जाईल. तसेच भविष्यात ही इंटरसिटी म्हणून धावावी यासाठी प्रयत्न केले जातील. नर्मदेश्वर झा, वरिष्ठविभागीय परिचालन व्यवस्थापक, सोलापूर