आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या अपघातानंतर प्रशासनाला जाग, सोलापूरची चिमणी पाडणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - निलंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकाॅप्टरला गुरुवारी अपघात झाल्याच्या पार्श्वभूमीवर खडबडून जागे झालेल्या श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्याची प्रक्रिया साेलापूर महापालिकेने सुरू केली आहे. सोलापूर विमानतळावरून विमान उड्डाणास ही चिमणी अडथळा ठरण्याची शक्यता हाेती. राज्याच्या अवर सचिवांनी या विमानतळाची  ही चिमणी पाडण्याचे अादेश दिलेले होते.

परंतु महापालिका प्रशासनाने त्यावर तत्परतेने कार्यवाही केली नव्हती. मात्र निलंग्यातील घटनेमुळे या कामाला अाता गती अाली अाहे.  होटगी रोडवरील सोलापूर विमानतळाच्या बाजूला सिद्धेश्वर साखर कारखाना अाहे. विमान उड्डाणास कारखान्याच्या चिमणीची (धुराडे) अडचण येत आहे. त्यामुळे ती चिमणी पाडण्यासंदर्भात अवर सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना १५ मार्च रोजी पत्राद्वारे अादेश दिला होता. जिल्हा प्रशासनाने ६ एप्रिल रोजी कारखान्यास चिमणीचे बांधकाम उतरवून घ्या, अन्यथा प्रशासन पाडेल, असे पत्राद्वारे कळवले होते.
 
१५ मे रेाजी जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात बैठक बोलावली होती. दरम्यान, मनपाला चिमणी पाडण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र कारखान्याने चिमणी न पाडल्याने महापालिकेने चिमणी पाडकाम करण्यासाठी अाता जाहीर निविदा प्रसिद्ध केली आहे. २६ मे ते ९ जूनपर्यंत निविदा भरण्याचा कालावधी देण्यात आला आहे.
 
हेलिकॉप्टर अपघात; महासंचालनालयाच्या पथकाने केली पाहणी 
लातूर मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताची गंभीर दखल घेत हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या मुंबई आणि दिल्ली येथील दोन वेगवेगळ्या पथकांनी शुक्रवारी सकाळी हैदराबादमार्गे निलंगा गाठले. दुपारी अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन त्यांनी घटनास्थळ गाठले. त्यांच्यासोबत आलेल्या तज्ज्ञांनी अत्यंत बारकाईने हेलिकॉप्टरची पाहणी करून माहिती घेतली. पथकाचे प्रमुख यशपाल आणि जोसेफ यांनी यासंदर्भात काहीही सांगण्यास नकार दिला. 
 
हेही वाचा.. 
 
बातम्या आणखी आहेत...