आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Mumbai Special Railway Train Starts On Mahaparinirvan Din

महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर - मुंबई विशेष रेल्वे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डिसेंबर रोजी लाखो भीमप्रेमी जनता अनुयायी चैत्यभूमी, दादर (मुंबई) येथे अभिवादनासाठी येतात. त्यांच्या सोयीसाठी सोलापूर रेल्वे विभागाच्या वतीने सोलापूर-मुंबई विशेष गाडी (क्र-०१४५६/ ०१४५५) सोडण्यात येणार आहे.

शनिवार, डिसेंबर रोजी सायंकाळी वाजून २० मिनिटांनी विशेष रेल्वे (गाडी क्रमांक ०१४५६) सोलापूर रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि मुंबईला रात्री वाजून २० मिनिटांनी पोहचेल. तर हीच गाडी (क्रमांक ०१४५५) मुंबईहून डिसेेंबर रोजी रात्री १२ वाजून २५ मिनिटांनी निघेल आणि सोलापूरला सकाळी १० वाजून १० मिनिटांनी पोहचणार आहे. या गाडीस १२ डबे जोडण्यात आले आहेत. गाडीस कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण, दादर आदी ठिकाणी थांबा देण्यात आला आहे.