आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाडीची वेळ बदलल्याने मिनी सिद्धेश्वरला प्रतिसाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर-मुंबई एक्स्प्रेसला आता चांगले दिवस आले आहेत. रेल्वे प्रशासनाने सोलापूरकरांच्या मागणीचा विचार करत गाडीस सुपरफास्टचा दर्जा दिला. परिणामी गाडीची वेळ बदलली आणि प्रवाशांचा प्रतिसाद वाढला. पूर्वी नकोशी वाटणारी ही गाडी आता प्रवाशांना हवीहवीशी वाटत आहे. त्यामुळेच गाडीला आता वेटिंग सुरू झाले अाहे.
जुन्या वेळापत्रकाप्रमाणे ही गाडी सोलापूर स्थानकावरून रात्री ८.२५ वाजत निघून मुंबईला साडेपाचच्या सुमारास पोहचत होती. मुंबई स्थानकावरून रात्री साडेनऊच्या सुमारास निघून सोलापूरला सकाळी साडेआठच्या सुमारास येत होती. मुंबईहून सोलापूरला येताना ही गाडी सिध्देश्वर एक्स्प्रेस पेक्षा सव्वातास आधी निघूनही सिद्धेश्वर एक्स्प्रेस सोलापूरला पोहचल्यानंतर दीड तासांनी म्हणजेच साडे आठ वाजता पोहचे. त्यामुळे प्रवासी या गाडीने प्रवास करणे टाळत.

नव्या वेळा पत्रकाप्रमाणे मात्र ही गाडी सोलापूर स्थानकावरून रात्री वाजून १० मिनिटांनी निघते. पुण्याला वाजून २० मिनिटांनी पोहचते. तर मुंबईला पहाटे वाजून १० मिनिटांनी पोहचत आहे. मुंबईहून सोलापूरला येताना ही गाडी वाजून २० मिनिटांनी मुंबई स्थानकावरून निघते. पुण्याला वाजून मिनिटांनी येते. तर सोलापूरला पहाटे साडेपाच वाजता पोहचते. सिध्देश्वर एक्स्प्रेसच्या दीड तास आधी सोलापूरला पाेहचत असल्याने गाडीस चांगला प्रतिसाद लाभत आहे.
बातम्या आणखी आहेत...