आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सीसीटीव्ही’साठी एक कोटी देणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापुरात सीसीटीव्ही लावण्यासाठी महापालिका एक कोटी रुपये मंजूर करणार आहे. त्यासाठी प्रस्ताव द्या. येत्या सर्वसाधारण सभेत त्याला मंजुरी मिळेल, असे महापौर प्रा. सुशीला आबुटे यांनी सांगितले.

‘अवैध धंदे चालणार नाहीत. दारू, ताडी, मटका, जुगार यावर अंकुश राहील. छेडछाड रोखण्यासाठी खास पथके कार्यरत राहतील,’ असे पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी सांगितले. पोलिस आयुक्तालयात शनिवारी महापालिका पदाधिकारी नगरसेवक यांच्याशी सेनगावकर यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी प्रभागातील अडचणी समजून घेतल्या. काही नगरसेवकांनी सूचनाही मांडल्या. यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी कार्यवाही केली जाईल, असे सांगण्यात आले. महिला, तरुणी यांची छेडछाड रोखण्यासाठी महिलांची पथके नेमली. दारूच्या मूळावरच घाव घालू, असे ते म्हणाले.
नगरसेवक म्हणाले
देवेंद्र भंडारी : आमच्याभागात घरगुती शिंदी, ताडी विकली जाते. त्यावर आळा आणावा.
कुमुद अंकाराम : मुलींचीछेडछाड थांबवा. बागेतही गोंधळ चालतो. त्यावर लक्ष ठेवा.
संजय हेमगड्डी : एककोटी रुपये सीसीटीव्हीसाठी देणार आहे. त्याला बजेटमध्ये मान्यता देऊ.
फिरदोस पटेल : बागेतमहिला, तरुणींची छेडछाड सुरू असते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी साध्या वेषातील महिला पोलिस नेमावेत.
आनंद चंदनशिवे : आमच्याभागातील अवैध व्यवसाय, वाहतूक समस्या दूर करा.
जगदीश पाटील : चोऱ्याथांबवा, घरफोड्या, बॅरिकेडिंग लावण्यासाठी माझ्या विकासनिधीतून दोन लाख रुपये देतो.