आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुतांश नगरसेवकांकडून जपण्यात येतेय स्वहितच!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका सभागृहात काही नगरसेवक जनहिताच्या निर्णयापेक्षा कार्यकर्त्यांचा आग्रह आणि स्वहिताचे प्रस्ताव आणत आहेत. यात महापालिकेचे हित पाहण्यात येत नाही. महापालिका कर्मचाऱ्यांसाठी सेंट्रल हाॅस्पिटल (केंद्रीय रुग्णालय) या चॅरिटेबल ट्रस्टमध्ये उपचाराच्या सोयीचा प्रस्ताव नगरसेवक अॅड. यू. एन. बेरिया यांनी मांडला. याशिवाय अनेक प्रस्ताव सभागृहात येत आहेत. सत्ताधारी पक्षाचे नेते, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी वैयक्तिक लाभाचे विषय सभागृहासमोर आणू नयेत, असा आदेश दिला असताना पुन्हा विषय येत आहेत.

जनतेवर परिणाम
महापालिका सभागृहात विषय आणताना जनहित समोर ठेवले पाहिजे. तसे होताना दिसून येत नाही. वैद्यकीय मदत, बेरोजगार आहे जागा द्या, मंडळ, संम्मेलनाला मनपाकडून अनुदान देणे आदी विषय सभागृहात आणण्यात येत आहेत. त्यामुळे जनजीवनावर परिणाम होताना दिसतो.

वैयक्तिक लाभाचे विषय नाही
^आमचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या आदेशानुसार मनपा सभागृहात नगरसेवकांचे वैयक्तिक लाभाचे विषय घेतले जाणार नाही. त्यामुळे यापुढे जागेचे विषय मनपा सभागृहात होणार नाही.” संजयहेमगड्डी, सभागृह नेता

जागेचे विषय आयुक्तांकडे
^स्थायीसमितीत जागेचे विषय आल्यास पडताळणी करून अभिप्रायसह आयुक्ताकडे पाठवतो. आयुक्तामार्फत तो विषय सभागृहात निर्णयासाठी पाठवला जातो. त्यानंतर पुढील निर्णय होताे.” सारिकाअकुलवार, उपअभियंता, भूमी मालमत्ता विभाग

रोजीरोटी साठी
^वैयक्तिकलाभाचा विषय नसून तो सामुदायिक आहे. शिवाजी चौकातील फेरीवाले माझ्या प्रभागातील आहेत. त्यांच्यासाठी पर्यायी जागा द्या अशी मागणी होती.” आनंदचंदनशिवे, नगरसेवक
तो विषय परत घेतला

^पक्षाचेधोरण ठरल्याने सेंट्रल हाॅस्पिटलमध्ये मनपा कर्मचाऱ्यांवर उपचार करण्याचा विषय मी पुन्हा घेतला आहे. त्यामुळे यापुढे मनपा सभागृहात वैयक्तिक लाभाचे विषय येणार नाहीत. सहकारी पक्ष विषय आणत असेल तर त्यांना समजून सांगून ते थांबवू.” अॅड.यू. एन. बेरिया, नगरसेवक

कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे प्रस्ताव
मंडळाचे अनुदान, वैयक्तिक मदत, बेकार आहे जागा द्या, संस्थेसाठी जागेची मागणी, आरक्षण बदल, चौक रस्त्यास नाव देणे, पुतळा सुशोभीकरण. अशा पद्धतीचे अनेक प्रस्ताव मंजुरीसाठी नगरसेवक स्थायी समितीपुढे किंवा सभागृहात आणत आहेत. काहींना आपल्या कार्यकर्त्यांना जगवणे महत्त्वाचे वाटते. काही प्रकरणात धनदांडग्यांचे हित जपत जागा आरक्षण बदल्याचा विषय आणला जातो.

अत्यावश्यक प्रस्ताव कमीच
पाणीपुरवठा,ड्रेनेज, रस्ता, दिवाबत्ती, स्वच्छता, कचराकुंडी, मनुष्यबळ पुरवठा, पूल आदी विषयांवर प्रस्ताव कमी.

जागेचे आरक्षण बदलण्याचे विषय
जागेवरच्या आरक्षणात बहुतेकवेळा बदल होत नसताना स्वहित साधून आरक्षण बदलाचे प्रस्ताव आणले जात आहेत. शिवसेेनेच्या नगरसेविका जयश्री बिराजदार यांनी शाळेचे, महेश काेठे यांनी चिल्ड्रन पार्कचा विषय आणला.

हे विषय
Áअॅड.यू.एन. बेरिया -सेंट्रल हाॅस्पिटल येथे मनपा कर्मचाऱ्यांवर उपचार करणे.
Áराजश्रीबिराजदार- प्राथमिकशाळेचे जागेचे आरक्षण बदला.
Áशिवलिंगकांबळे- पाण्याच्याटाकी परिसरात गाळे बांधणे.
Áकल्पनाकारभारीचंद्रकांत रमणशेट्टी -शेळगीत रस्त्याची रुंदी कमी करा.
Áप्रवीणडोंगरे- १८मीटर ऐवजी १४ मीटर रस्ता करा.
Áआनंदचंदनशिवे- एसटीस्टॅन्ड परिसरातील खोके हटवू नका.
Áमनोहरसपाटे- माटेबगीचा
Áपद्माकरकाळे- मंडळांनाव्यापारी संकुलवरची टेरेस जागा देणे

अधिकार आहे म्हणून
जागेचे आरक्षण बदलण्याचा अधिकारी एमआयटीपी कायदा १९६६ नुसार आहे. पण त्याचा वापर योग्य कामासाठी हाेणे अपेक्षित अाहे. ते इतरांच्या घशात जाऊ नये याची काळजी नगरसेवक घेत नाहीत.
--------------------------