आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Municipal Corporation Income Decrease By 51 Crores

पालिकेचे उत्पन्न ५१ कोटींनी घटले, वसुली मोहीम सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मागील आर्थिक वर्षात डिसेंबरअखेर मिळकत करातून २०४.३९ कोटी मिळाले होते. यंदाच्या वर्षात १५२.७० कोटी कर वसूल करण्यात आला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ५१.६९ कोटी रुपयांची घट झाली आहे. दरम्यान महापालिकेने कर थकबाकी वसुली मोहीम सुरू केली आहे. शनिवारी कराची थकबाकी भरल्याने तीन शाळा तसेच एलबीटी वसुलीपोटी पाच दुकाने सील करण्यात आली. महापालिकेचे उत्पन्न घटल्याने कर आकारणी विभागाने शहरात कर वसुली मोहीम सुरू केली आहे. हद्दवाढ विभागाने १५ मोठ्या थकबाकीदारांची यादी जाहीर केली तर थकबाकीपोटी नळ जाेड बंद करण्यासाठी नाेटीस काढण्याचे काम सुरू आहे.

शनिवारी करण्यात आलेल्या कारवाईत थकबाकीपोटी मजरेवाडीतील आदर्श नगर येथील अहिल्याबाई प्रशालेच्या दोन इमारती, अक्कलकोट रोडवरील हाजी महिबूबसाब राजेसाब शेख स्कूल सील केले. शिवाय कर भरल्याने हत्तुरेवस्ती येथील चंद्रकांत बंडू टकले, जगदंबा नगरातील रानप्पा महेश दहीहंडे यांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. कर आकारणी विभागाने ११८ कोटी उद्दिष्टापैकी ४४.४७ कोटी वसुली केली आहे.