आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीच्या धामधुमीमध्ये मनपापुढे आर्थिक अंधार, उत्पन्नामध्ये १३ टक्क्यांनी झाली घट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक बनली आहे. एलबीटी बंद झाल्याने उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाले. तूर्त शासनाकडून दरमहा १२ कोटी अनुदानातून कर्मचाऱ्यांचे वेतन होत आहेत. निधीअभावी इतर भांडवली कामे, मक्तेदारांची बिले, नगरसेवकांच्या फंडातून होणारी कामे थांबली आहेत. कारभार चालविण्यासाठी दरमहा मनपाला २० कोटी आवश्यक आहे. तर दुसरीकडे प्रलंबित देणी १८३.६९ कोटी आहे.

उत्पन्न वाढले नाही म्हणून महापालिका कर आकारणी, गवसु, हद्दवाढ विभाग, मंडई विभागातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याशिवाय कर्मचाऱ्यांना नोटिसा दिल्या. उत्पन्नात घट झाल्याने कचरा गोळा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन थांबले, साहित्य खरेदी थांबली, नागरी सुविधेसाठी रकमा नसल्याने नवीन जलवाहिनी, रस्त्याची कामे थांबवण्यात आली आहेत. मक्तेदारांना काम करू नका, असे सांगण्यात आले आहे.

एलबीटीत घट
गतवर्षीच्यातुलनेत यंदा उत्पन्नात सुमारे १३ टक्के घट झाली. २०१४-१५ मध्ये ऑक्टोबर अखेर ४३३ कोटी उद्दिष्टांपैकी १६५.९५ कोटी उत्पन्न मिळाले होते तर २०१५-१६ मध्ये ऑक्टोबर अखेर ५२६.२६ कोटी उद्दिष्टांपैकी १३०.१२ कोटी उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षात ३८.२९ टक्के तर चालू वर्षात २४.७३ टक्के वसुली झाली आहे. १३.५६ टक्क्यांनी वसुली घट झाली आहे. एलबीटी, कर आकारणी, भूमी मालमत्ता, हद्दवाढ, नगर अभियंता, आरोग्य खात्याचे उत्पन्न घटले आहे.

अशी आहे देय रक्कम
जिल्हानियोजन समिती अनुदान सन २०१३-१४ (मनपा हिस्सा) - ८, जिल्हा नियोजन समिती अनुदान सन २०१४-१५ (मनपा हिस्सा) - २.५०, पायाभूत सुविधा उपलब्ध करणे योजना (मनपा हिस्सा) - ६, सेवानिवृत्तीधारकांची थकीत रक्कम - १०.५०, मक्तेदारांची देणी - ४२, सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना राज्यस्तर वाढीव खर्च - ८४.४९, शासकीय कर्ज - ३०.२०, एकूण - १८३.६९
बातम्या आणखी आहेत...