आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर नगरपालिका निवडणुक - मोदींचा ‘प्रभाव’ विरुद्ध शिंदेंचा ‘करिष्मा’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर -  शहरात गेल्या चाळीस वर्षांत सातत्याने काँग्रेस सत्तेत राहिली अाहे. १९८५ मध्ये पुलोदच्या काळताच काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता. पण तोही फार काळ टिकला नाही. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशातीलच नव्हे तर नगरपालिका निवडणुकीतूनही राजकीय वातावरण बदलताना दिसत अाहे. शहरातील समस्यांमुळे काँग्रसेच्या महापालिका कारभाराबद्दल जनतेत नाराजी वाढली अाहे. पण दुसरीकडे गेल्या दीड, दोन वर्षात राज्यातील भाजप सरकारकडून शहरातील विकासात प्रत्यक्षात फारसी मजल मारता अाली नाही. दोन्ही पक्षाबद्दल जनतेत नाराजी अाहे. नरेंद्र मोदींची महत्त्वाकांक्षी योजना स्मार्ट सिटी कागदावरच राहिली अाहे. त्यामुळे सोलापुरातील लढाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव विरुद्ध काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा करिष्मा अशीच होण्याची चिन्हे अाहेत. 

महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर अाता पुढील सत्तेचे अाडाखे बांधणे सुरू झाले अाहे. सोलापुरात काँग्रेस सत्तेत अाहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सोबती अाहे. पण या दोन्ही पक्षांनी अाजवर कधीही अाघाडी केली नाही. त्यांना टक्कर देण्यासाठी भाजप-सेनेकडून युती झाली, नंतर तेही स्वतंत्र लढले. गेल्या निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक मोठा पक्ष ठरला तर भाजप प्रमुख विरोधी पक्ष ठरला. राष्ट्रवादी काँग्रेस अाणि शिवसेनेला १५ च्या वर कधी जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे येत्या निवडणुकीच्या निकालात कोणाचा फरफाॅर्ममन्स कसा राहतो, याची बदलत्या राजकीय समीकरणात अौत्सुक्याचा विषय अाहे. 

सोलापूर शहरातील विकासकामे नियोजनद्ध करण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेला जमले नाही. अगोदर रस्ता करायचा अाणि नंतर ड्रेनेजसाठी तो खोदायचा अशा पध्दतीनेच सर्व बाबतीत कामे झाली अाहेत. स्वच्छता अाणि कचराकुंडी याचेही नियोजन झाले नाही. एकूण शहराचा विचार करून विकास करण्यासाठी महापालिकेचा पुढाकार दिसला नाही. सुशीलकुमार शिंदे हे केंद्रात मंत्री असताना परिवहन समितीला बसेस मिळाल्या, केंद्राच्या अनेक योजनेतून निधी मिळाला, पण महापालिकेच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांना त्याचे नियोजन करून उपयोग करून घेता अाला नाही. त्यामुळे मनपाची अार्थिक स्थितीही खालावली. शहरातील अनेक विकासकामे रखडली. त्यामुळे जनतेत महापालिकेच्या कारभाराबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी अाहे. राजकीयदृष्ट्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर शहर मध्यमधील विजय काँग्रेसला संजीवनी देणारा ठरला होता. 

दुसरीकडे लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही भाजप-सेनेची सत्ता अाल्यानंतर स्मार्ट सिटीत सोलापूरची निवड झाली. त्याचा खूपच गाजावाजा झाला. देशात ठरावीक शहरांच्या यादीत सोलापूर झळकले. पण गेल्या वर्षभरात स्मार्ट सिटीचा कारभार केवळ कागदावरच दिसतो अाहे. स्मार्ट सिटीची काहीच कामे सुरू झाली नाहीत, हा मुद्दा भाजपसाठी अडचणीचा ठरू शकतो. शहरातून जाणाऱ्या महामार्गाचा विषय मार्गी लागेल अाणि अपघात घटतील अशी अपेक्षा होती. पण त्याबाबतही काही झाले नाही. अाता भाजप सरकारने येणाऱ्या काळात खूप कामे होतील, अशी स्वप्ने वेगवेगळ्या योजना अाणून लोकांना दाखवली अाहेत. पण ती प्रत्यक्षात कधी येणार हा प्रश्न अाहेच. नोटाबंदीचा परिणाम नगरपालिका निवडणुकीत दिसला नाही, अाता किती दिसेल हाही मोठा प्रश्न अाहे. 

नरेंद्र मोदी अाणि भाजप सरकारचा प्रभाव नगरपालिका निवडणुकांनी दाखवून दिला अाहे. तो सोलापूर शहरातही दिसणार का? की सुशीलकुमार शिंदे यांचा सोलापुरातील स्थानिक संपर्क अाणि त्यांचा करिष्मा काँग्रेसला तारणार याचे उत्तर येणाऱ्या निवडणुकीतून दिसणार अाहे. 

शिवसेनेचे विस्कळीत संघटन : शिवेनेचीधुरा सध्या काँग्रेसमधून अालेल्या महेश कोठे अाणि अकलूजचे धवलसिंह मोहिते यांच्याकडे अाहे. त्यामुळे मूळचे शिवसेनेचे असलेले नेते सध्या नाराज दिसताहेत. मागे ही गटबाजी उघडपणेही दिसून अाली अाहे. तरीही महेश कोठे यांचे राजकीय कौशल्य या निमित्ताने पणाला लागले अाहे. स्वबळावर लढल्यास सेनेला मोठ्या ताकदीने लढावे लागेल, हे मात्र नक्की. नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेही तीन ठिकाणी सत्ता मिळवल्याने सेनेचाही अात्मविश्वास वाढला अाहे. 
 
निवडणूक जाहीर झाल्यानंतर अाता पुढील सत्तेचे अाडाखे बांधणे सुरू झाले अाहे. सोलापुरात काँग्रेस सत्तेत अाहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सोबती अाहे. पण या दोन्ही पक्षांनी अाजवर कधीही अाघाडी केली नाही. त्यांना टक्कर देण्यासाठी भाजप-सेनेकडून युती झाली, नंतर तेही स्वतंत्र लढले. गेल्या निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक मोठा पक्ष ठरला तर भाजप प्रमुख विरोधी पक्ष ठरला. राष्ट्रवादी काँग्रेस अाणि शिवसेनेला १५ च्या वर कधी जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे येत्या निवडणुकीच्या निकालात कोणाचा फरफाॅर्ममन्स कसा राहतो, याची बदलत्या राजकीय समीकरणात अौत्सुक्याचा विषय अाहे. 

सोलापूर शहरातील विकास कामे नियोजनध्द करण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेला जमले नाही. अगोदर रस्ता करायचा अाणि नंतर ड्रेनेजसाठी तो खोदायचा अशा पध्दतीनेच सर्व बाबतीत कामे झाली अाहेत. स्वच्छता अाणि कचरा कुंडी याचेही नियोजन झाले नाही. एकूण शहराचा विचार करून विकास करण्यासाठी महापालिकेचा पुढाकार दिसला नाही. सुशीलकुमार शिंदे हे केंद्रात मंत्री असताना परिवहन समितीला बसेस मिळाल्या, केंद्राच्या अनेक योजनेतून निधी मिळाला, पण महापालिकेच्या पदाधिकारी, अधिका-यांना त्याचे नियोजन करून उपयोग करून घेता अाला नाही. त्यामुळे मनपाची अार्थिक स्थितीही खालावली. शहरातील अनेक विकास कामे रखडली. त्यामुळे जनतेत महापालिकेच्या कारभाराबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी अाहे. राजकीय दृष्ट्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर शहर मध्य मधील विजय काँग्रेसला संजीवनी देणारा ठरला होता. 
 
दुसरीकडे लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही भाजप-सेनेची सत्ता अाल्यानंतर स्मार्ट सिटीत सोलापूरची निवड झाली. त्याचा खुपच गाजा-वाजा झाला. देशात ठराविक शहरांच्या यादीत सोलापूर झळकले. पण गेल्या वर्षभरात स्मार्ट सिटीचा कारभार केवळ कागदावरच दिसतो अाहे. स्मार्ट सिटीची काहीच कामे सुरू झाली नाहीत, हा मुद्दा भाजपसाठी अडचणीचा ठरू शकतो. शहरातून जाणा-या महामार्गाचा विषय मार्गी लागेल अाणि अपघात घटतील अशी अपेक्षा होती. पण त्याबाबतही काही झाले नाही. अाता भाजप सरकारने येणा-या काळात खुप कामे होतील, अशी स्वप्ने वेगवेगळ्या योजना अाणून लोकांना दाखविली अाहेत. पण ती प्रत्यक्षात कधी येणार हा प्रश्न अाहेच. नोटाबंदीचा परिणाम नगरपालिका निवडणुकीत दिसला नाही, अाता किती दिसेल हाही मोठा प्रश्न अाहे. 
 
नरेंद्र मोदी अाणि भाजप सरकारचा प्रभाव नगरपालिका निवडणुकांनी दाखवून दिला अाहे. तो सोलापूर शहरातही दिसणार का? की सुशीलकुमार शिंदे यांचा सोलापुरातील स्थानिक संपर्क अाणि त्यांचा करिष्मा काँग्रेसला तारणार याचे उत्तर येणा-या निवडणुकीतून दिसणार अाहे. 
 
शिवसेनेचे विस्कळीत संघटन 
शिवेनेची धुरा सध्या काँग्रेसमधून अालेल्या महेश कोठे अाणि अकलुजचे धवलसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे अाहे. त्यामुळे मुळचे शिवसेनेचे असलेले नेते सध्या नाराज दिसताहेत. मागे ही गटबाजी उघडपणेही दिसून अाली अाहे. तरिही महेश कोठे यांचे राजकीय कौशल्य या निमित्ताने पणाला लागले अाहे. स्वबळावर लढल्यास सेनेला मोठ्या ताकदीने लढावे लागेल हे मात्र नक्की. नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेही तीन ठिकाणी सत्ता मिळविल्याने सेनेचाही अात्मविश्वास वाढला अाहे. 

दोन मंत्र्यांच्या दोन तऱ्हा 
सोलापूरशहराला पहिल्यांदाच दोन मंत्रिपदे मिळाली अाहेत. भाजपचे विजयकुमार देशमुख अाणि सुभाष देशमुख हे दोघेही मंत्री असले तरी पक्षसंघटनेत मात्र त्यांच्यातील सख्य पक्षाला अडचणीचे ठरू लागले अाहे. दोघांच्या दोन तऱ्हा अशीच सध्याची स्थिती अाहे. खासदार शरद बनसोडे यांच्याबद्दलही जनतेत नाराजी अाहे. दोन मंत्री एक खासदार ही मोठी ताकद असल्याने भाजप बहुमत मिळवून सत्तेत येणार का? अाणि त्यासाठी हे तिघेही एकत्र येणार का? यावरही भाजपचे यशापयश अवलंबून अाहे. 

राष्ट्रवादीला अजितदादा संजीवनी देणार का? 
राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापुरात यश मिळवून देण्याच्या उद्देशाने अजित पवार यांनी स्वत:च पक्षाची सूत्रे हाती घेतली अाहेत. कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याचा प्रयत्न त्यांनी केला अाहे. नगरपालिकेत तो फारसा फायद्याचा ठरला नाही. पण सोलापूर महापालिकेत ते कितपत यशस्वी ठरतात, याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष लागले अाहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी हाच मोठा कळीचा मुद्दा अाहे.