आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... अशा शाळेत आपल्या मुलांनी शिकावे असे कोणाला बरं वाटेल?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका शाळांच्या इमारतीची, तेथील सोयींची स्थिती खूपच वाईट आहे. ते पाहून कोणत्या पालकास वाटेल की अशा शाळेत आपल्या पाल्याला टाकावे? शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांमध्ये पायाभूत सुविधा असणे गरजेचे आहे. सोलापूर महापालिकेच्या शाळांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव अाहे. शासन-प्रशासनाकडून शिक्षण हक्क कायदा (आरटीआय) अंमलाबाबात खासगी संस्थांना आग्रह धरला जात आहे. परंतु महापालिकेच्या शाळाच कायद्याचे प्राथमिक निकष पूर्ण करत नसल्याचे दिसत आहे.
महापालिकेच्या ५९ शाळा सध्या सुरू आहेत. त्यामध्ये मराठी, कन्नड, तेलुगु उर्दू माध्यमांचा समावेश आहे. शाळांमध्ये अपंग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प नाही, पुरेशा वर्ग खोल्या नाहीत, विजेची सोय नाही, मुख्याध्यापकांना बसण्यासाठी स्वतंत्र खोली नाही, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय तर खूप लांबची गोष्ट आहे.

उर्दू शाळा क्रमांक मध्ये पाण्याची अडचण, क्रमांक २९ मध्ये स्वच्छतागृहबरोबर पाण्याची सोय नाही. विजापूर नाका येथील क्रमांक मध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह नाही. येथील तीन वर्गामध्ये पावसाळ्यात पाणी साचते. त्या काळात शाळा भरविण्यात अडचण येते. एकंदरीत पूर्ण इमारत चांगली नाही. रामवाडी येथील मराठी, कन्नड,उर्दू प्रशालेमध्ये पहिली ते दहावीपर्यंत शाळा भरत आहे. तेथे सरंक्षक भिंत नाही. पिण्याचे पाणी नाही. डीएसके विनायक नगर शाळेत वर्ग खोल्या नाहीत. पहिली ते सातवीपर्यंत शाळा भरते.
क्रमांक २७, उर्दू संगमेश्वर नगर, क्रमांक पांढरे वस्ती, उर्दू शाळा चंद्रकला नगर यांना स्वत:ची जागा नाही, इमारत नाही. क्रमांक ५ च्या बँक खात्यावर साडेआठ लाख रुपयांचा निधी आहे. परंतु जागा नसल्याने इमारत बांधता येत नाही. क्रमांक शाळा राजकीय दबावापोटी हटवून ती समाज मंदिरात भरवली जात आहे. बालवाडी बालकामगारचे विद्यार्थी उघड्यावर बसत आहेत. विजेची देखील सोय नाही.
महापािलका शाळा
सुदंराबाई डागा उर्दू मुलांची शाळा क्रमांक तेलुगु मुलांची क्रमांक मध्ये अतिक्रमण झाले आहे. शाळा क्रमांक मध्ये सरंक्षक भिंतीच्या आत परिसरातील लोक शेणखत टाकत आहेत. त्यामुळे परिसरात प्रचंड घाण दुर्गंधी असते. शिक्षक महापालिका आयुक्तांनी ते शेण काढण्यास सांगितले तरीही हटवण्यात आले नाही. क्रमांक २, २१ १६ मध्ये मैदानवर एका हॉटेल चालकांनी अतिक्रमण करत चूल थाटली आहे. शाळेच्या पटांगणातून येण्या-जाण्यासाठी वापर होत आहे. संरक्षक भिंत नसल्याने सायंकाळी मद्यपान करणा ऱ्यांची गर्दी होते.
महापालिकेच्या शाळेमधून अनेक मान्यवर व्यक्ती घडल्या आहेत. त्यांना शाळांविषयी आपुलकी आहे. पाच वर्षापूर्वी दाजी पेठमधील शाळा क्रमांक विकसित करण्यासाठी पुढाकार घेऊन काहींनी काम केले. त्यामुळे शाळा चांगल्या पध्दतीने विकसित झाली आहे. शाळा निधीमुळे सुधारणा हाेऊ शकत नाही. त्या प्रशासकीय अधिका ऱ्यांबरोबर नागरिकांनी देखील शाळा विकसित करण्यासाठी प्रयत्न करावा. शासनाकडे वाढीव निधी मिळावा यासाठी प्रयत्न करेन.

निधीची कमतरता, देखभाल-दुरुस्ती शक्य नाही
व्यंकटेशकटके, सभापती,महापालिका शिक्षण मंडळ
निधीमुळे शाळा दुरुस्ती अथवा बांधकामाची कामे करता येत नाहीत.अनेक शाळामध्ये शौचालय पायभूत सुविधा नाहीत. निधीसाठी वारंवार पालिका आयुक्त, नगरसेवक, तसेच खासदार आमदारांकडे निधीसाठी मागणी केली . परंतु कोणीच सकारात्मकता दाखविली नाही. गेल्या वर्षी सरासरी तीन कोटींचा निधी शिक्षण मंडळाला मिळाला तो कमी पडत आहे. त्यामुळे वाढीव मागणी केली आहे.”

सर्वशाळांच्या स्थिती, सुविधांची माहिती घेऊ
सुधासाळुंखे, प्रशासनाधिकारी,महापालिका शिक्षण मंडळ
भौतिक सुविधांचा अभाव दूर करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करण्यात येईल. दोन दिवसांपूर्वी पदभार घेतला आहे. त्यामुळे शिक्षण हक्क कायद्यानुसार सुविधांची माहिती घेऊन यावर उपाय करण्याकडे लक्ष देण्यात येईल. बजेट मिळाले की पदाधिकारी प्रशासन यांच्या मदतीने महापालिका शाळांमधील गैरसोई दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”

चांगल्यासुविधा असतील तर प्रवेश घेतील ...
नागनाथजाधव, पालक
मनपाच्याशाळांमध्ये खासगी शाळांप्रमाणे सुविधा नसतात. त्यामुळे स्पर्धेच्या युगात विद्यार्थी टिकले पाहिजेत. त्यासाठी सर्व गोष्टीचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळणे गरजेचे आहे.त्यामुळे पालक शक्य तो मनपाच्या शाळामध्ये विद्यार्थी घालत नाहीत. जर सुविधा चांगल्या शैक्षणिक दर्जा चांगला असेल तर नक्कीच पालक विद्यार्थ्यांना मनपाच्या शाळेत प्रवेश घेतील.”
क्रमांक २च्या आवारात शेण टाकण्याचा प्रकार अनेक महिन्यांपासून होत आहे. येथे घाण आणि दुर्गंधी पसरते.