आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेतन, सानुग्रह अनुदानासाठी कर्मचारी कोर्टात जाणार, परिवहन समितीतील कामगार संघटनेचा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका परिवहन कर्मचाऱ्यांचा पगार आणि सानुग्रह अनुदानाबाबत काहीच तोडगा निघाल्यामुळे कामगार संघटना कृती समितीने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कामगार नेते अशोक जानराव यांनी दिली. 
 
सहायक कामगार आयुक्त डी. आर. देशमुख यांच्या कार्यालयात बुधवारी दुपारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत महापालिकेने तारखेपर्यंत मुदत मागितली होती. त्यानुसार नोव्हेंबर रोजी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी सहायक कामगार आयुक्त डी. आर. देशमुख, परिवहन व्यवस्थापक अभिजित हराळे, अशोक जानराव, जनार्दन शिंदे, चांगदेव सोनवणे, वडावराव, तांबोळी आदींची उपस्थिती होती. 
परिवहन कर्मचाऱ्यांचा सहा महिन्यांचा पगार थकलेला आहे. त्यापैकी फक्त एक महिन्याचा पगार देऊ, अशी भूमिका महापालिकेने यांनी घेतली. यावरून कामगार संघटनेनी पगार तर द्याच आणि सानुग्रह अनुदान ही द्या. सानुग्रह अनुदान जर दिले तर १८ लाख खर्च येतो आणि एक महिन्याचा पगार दिला तर ९२ लाख रुपये खर्च येतो. त्यासाठी या महिन्यात सानुग्रह अनुदान द्या आणि पुढच्या महिन्यात पगार द्या, अशी भूमिका कामगार संघटनेने घेतली आहे. यावर महापालिकेला ते शक्य नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना जर सानुग्रह अनुदान दिले असेल तर परिवहन कर्मचाऱ्यांना सुध्दा देणे आवश्यक आहे, असे म्हणणे सहायक कामगार आयुक्त देशमुख यांनी मांडले. तरीही महापालिकेने शक्य नसल्याचेच सांगितले. यावर कामगार संघटनेेने सहा महिन्याचा पगार आणि सानुग्रह अनुदानाबाबत न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला 
 
४-५ दिवसांत निर्णय 
परिवहन कर्मचाऱ्यांचा पगार आणि सानुग्रह अनुदान देण्यास महापालिकेने नकार दिल्यामुळे आम्ही न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या चार ते पाच दिवसांत आवश्यक सर्व कागदपत्रे घेऊन न्यायालयात जाऊ. 
- अशोकजानराव, कामगार नेते 
बातम्या आणखी आहेत...