आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकअपेक्षा; काही माफक, काही रास्त, काही अतिउंच! उद्योजक, व्यापारी, नागरिकांची महापालिकेत बैठक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेविषयी काही माफक, काही रास्त तर काही उंच अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केल्या. नवसत्ताधारी भाजपच्या सभागृह नेत्यांनी शहरातील उद्योजक, व्यापारी, नागरिकांची बैठक घेत विकासकामांविषयी अपेक्षा जाणून घेतल्या. ‘स्मार्ट’ कामांची भरघोस आश्वासने वचननाम्यात देत सत्तेत आलेल्या भाजपने शनिवारी निवडक नागरिकांशी संवाद साधला. 
 
महापालिकेचे दवाखाने सक्षम करा, शुद्ध मुबलक पाणी द्या, विमानतळासाठी प्रयत्न करा, विडी कामगारांना पर्यायी रोजगार द्या, उद्योगांना पाणी आणि उद्योजकांना सन्मान द्या, अशा मागण्या मांडण्यात आल्या. त्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. या वेळी महापालिका अधिकारी उपस्थित होते. मंचावर महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, पक्षनेता सुरेश पाटील, पालकमंत्री देशमुख, महापालिका आयुक्त विजयकुमार काळम, अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार, उद्योजक बिपीन पटेल, राम रेड्डी, प्रभाकर वनकुद्रे, पेंटप्पा गड्डम, राजू राठी आदी होते. 
 
महापौरांची हजेरी 
बैठकीतमहापौर शोभा बनशेट्टी या उशिरा आल्या. वीस मिनिटे बसल्या. त्यानंतर ‘लोकमंगल’च्या कार्यक्रमासाठी निघून गेल्या. 
 

सत्ताधाऱ्यांचे आश्वासन 
- सर्वांच्यासूचनांंचानिश्चित विचार करू आणि शहराचा चेहरामोहरा बदलू.” सुरेशपाटील, सभागृह नेता, महापालिका 
- राजकारणकरता फक्त विकास करणार आहोत. सूचना निश्चित चांगल्या आहेत. त्यांचा समावेश करून सर्वांना सोबत घेऊन शहराचा विकास करू.” विजयकुमारदेशमुख, पालकमंत्री 
 
बिपीन पटेल : मनपादवाखान्यांतील डॉक्टरांची रिक्त पदे भरा. हे दवाखाने खासगी दवाखान्यांशी जोडा, बाजारपेठेत पार्किंगची सोय करा, रिंगरूट बायपास रस्ता करा, ड्रेनेजचे काम झाल्यावरच रस्ते करा, दुभाजक सुशोभीकरण करा. 
 
डॉ.राजाराम पोवार : शहरातील३५ टक्के लोक शासकीय दवाखान्यात येतात. त्यासाठी शासकीय दवाखाना आणि महापालिकेचे दवाखाने अद्ययावत व्हावेत, रिक्त पदे भरावीत, मुबलक निधी मिळावा. 
 
डॉ.शिरीष कुमठेकर : उद्योगवाढीसाठीविमानतळ सुरू होणे अत्यावश्यक आहे. विमानतळ लवकरात लवकर सुरू करावे, नवनवीन उद्योग आणावेत. 
पशुपतीमाशाळ : युजरचार्जेस रद्द व्हावे, वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, टूरिस्ट प्लेस व्हावे, बाजारपेठ सुसज्ज व्हावे. 
 
केतन शहा : शहराचेप्रत्येक प्रवेशद्वार सुंदर व्हावे, खासगी ट्रॅव्हल्सची जागा निश्चित करावी, बाजारपेठेत पार्किंगची सोय व्हावी, सोलापूर दर्शन बस सुरू व्हावी, रिंगरूट मार्ग लवकर व्हावा. 
 
प्रदीप पिंपरकर : पुण्याच्याधर्तीवर कर आकारणी व्हावी, नाल्यावर शॉपिंग सेंटर उभारावे, या शॉपिंग सेंटरवर रस्त्यावरील टपऱ्यांचे पुनर्वसन करावे. 
 
विद्या लोलगे : बांधकामपरवाने त्वरित मिळत नाहीत. त्या त्वरित द्यावेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांची प्रामाणिक काम करण्याची मानसिकता हवी. 
 
राजेंद्र कासवा : गरजनसलेल्या ठिकाणी कामे करू नये, सर्व नगरसेवकांना समान निधी मिळावी. १९७७ आणि १९९७ मधील डीपी प्लानची अंमलबजावणी अद्याप झाली नाही. आरक्षित जागांचा विकास अद्याप झाला नाही, तो व्हावा. सक्षम आणि कायमस्वरुपी अधिकारी हवा. 
 
 
राम रेड्डी : शहराचापाणीपुरवठा विस्कळीत झाला की, एमआयडीसी चिंचोळीमधील पाणीपुरवठा बंद करण्याची मागणी केली जाते. हे चुकीचे असून, सुविधा दिल्या नाहीत तर उद्योग चालणार कसे? तसेच शहर विकास निधीचे नियोजनपूर्ण काम व्हावे. 
 
राजू राठी : शुद्धआणि सुरळीत पाणीपुरवठा करा, तुळजापूर रोड विकसित करा, अग्निशामक दल आधुनिक करा, एमआयडीसीमधील खुल्या जागांचा विकास करा, उद्योजकांना सन्मानाची वागणूक द्या. 
 
पेंटप्पा गड्डम : शुद्धआणि मुबलक पाणीपुरवठा करा, महिला विडी कामगारांकरिता पर्यायी रोजगाराची सोय करून द्या. 
 
संतोष सुरवसे : चिल्ड्रनपार्क व्हावे, भाजी मंडई अद्ययावत व्हावी, अतिक्रमण काढावे. 
 
मिलिंद भोसले : शहरात सर्वत्र महिला आणि पुरुषांकरिता स्वतंत्र प्रसाधनगृह व्हावे. दुभाजक झाडे लावून त्यांची देखरेख करावी. 
 
आधीही अशा बैठका, कामे झाली नाहीत 
शहर विकासावर आधीच्या सत्ताधाऱ्यांनी बैठका घेतल्या मात्र काही कामे झाली नाहीत. आता गल्ली, मुंबई ते दिल्लीत तुमचे सरकार आहे. कामे होण्यात अडचण नाही. महापालिका प्रशासन काहीच कामाचे नाही. एक काम वेळेवर होत नाही. या सुस्त प्रशासनाला सुधारणे गरजेचे आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...