आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचराकुंड्या ओसंडू लागल्या, सोलापूर मनपाचे दुर्लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- एरवीच्या तुलनेत दिवाळीत कचऱ्याचे प्रमाण २० टक्के वाढते. अशा स्थितीत कचरा उचलण्यासाठी विशेष नियोजन करणे गरजेचे होते. मात्र, तसे नियोजन झालेले नसल्याने शहरातील अनेक भागात कचराकुंड्या साठून आहेत. काही ठिकाणी कचरा रस्त्यावर, परिसरात विखुरला गेला आहे.
 
रोज ३०० टन कचरा निर्माण होत आहे. पण महापालिकेने मागील चार दिवसांत सरासरी २२९ टन कचरा उचलला. हद्दवाढ भागात समावेश असलेला शहरातील सर्वात मोठ्या झोन क्रमांक पाचमध्ये चार दिवसांत फक्त ५४ टन कचरा उचलला तर सर्वात जास्त झोन क्रमांक आठमध्ये १७६ टन कचरा उचलला. बाजार पेठ परिसरातील झोन क्रमांक एकमध्ये १३२ टन कचरा उचलला गेला. अनेक ठिकाणी कंटेनर भरून वाहत असून, तो उचलण्याचा पत्ता नाही. सर्वत्र कचरा साचला आहे.
 
सोमवारपासून दिवाळी उत्सव सुरू झाला. या काळात मधला मारुती, टिळक चौक, नवी पेठ, ७० फूट रोड, अशोक चौक, भुसार गल्ली, चाटी गल्ली, कुंभार वेस, कन्ना चौक परिसरात जास्त कचरा साचतो. तो वेळेवर उचलणे आवश्यक असून, या परिसरातील कंटेनर भरून वाहत आहेत. यात प्लास्टिक, बाॅक्स, फूल, फटाक्याचा कचऱ्यांचा समावेश आहे. महापालिकेकडे कचरा उचलण्यासाठी मनुष्यबळ कमी आहे. शहरात रोज ३०० टन कचरा निर्माण होत असून, त्यापैकी सुमारे २५० टन कचरा उचलणे आवश्यक असताना मागील चार दिवसांत सरासरी २२९ टन कचरा उचलला गेला.

2 दिवसांत कचरा उचलू
उत्सव काळात कचरा जास्त असतो. त्यामुळे राहिला असेल. कर्मचाऱ्यांची अडचणी होती. ती शनिवारी दूर झाली. त्यामुळे दोन दिवसांत कचरा पूर्णपणे उचलू. झोन पाचमधील गाडी बंद पडली होती. ती दुरुस्त केली. - संजय जोगधनकर, मनपा सफाई अधीक्षक
 
बातम्या आणखी आहेत...