आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्क चौपाटीवरील अतिक्रमण काढले; दहा गाड्यांवर मनपाची कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरातील मध्यवर्ती भागातील पार्क चौपाटी परिसरातील अतिक्रमण शुक्रवारी सायंकाळी काढण्यात आले. सुमारे दोन तास चाललेल्या या मोहिमेत सुमारे दहा गाड्या हटवण्यात आल्या तसेच खुर्च्या इतर साहित्य जप्त करण्यात आले. महापालिका भूमी मालमत्ता विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. 
 
पार्क चौपाटी येथे गाडीधारकांना जागा निश्चित करून देण्यात आली आहे. मात्र, गाडीधारक अतिक्रमण करून जास्त जागा संपादन करून रहदारीस अडथळा आणत आहेत. 
महापालिकेकडून कारवाई करत नसल्याने अतिक्रमण वाढत गेले. त्यामुळे तक्रारी वाढल्या. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून मनपा भूमी मालमत्ता विभागाच्या वतीने अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केली. एक जेसीबी, डंपरच्या सहाय्याने कारवाई करून खुर्च्या, हातगाड्या जप्त करण्यात आल्या. गाळ्याच्या समोर असलेला कट्टा महापालिकेने काढला. या वेळी मनपा भूमी मालमत्ता विभागाच्या अधिकारी सारिका आकुलवारसह पथक उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...