आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता जिद्द सत्यात उतरवू, स्मार्ट सिटी जाहीर, सोलापूर महापालिकेत जल्लोष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्र सरकारने स्मार्ट सिटीच्या पहिल्या यादीत सोलापूरचे नाव जाहीर केले अन् महापालिकेत भरती मुलाखतीत व्यस्त असलेल्या मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडला. त्यानंतर त्यांचा मोबाइल खणाणू लागला. महापालिकेत हळूहळू नागरिकांची गर्दी झाली. फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांचा नगारा, गुलालाची मुक्त उधळण झाली. महापौर सुशीला आबुटे, जयश्री व विजयकुमार काळम-पाटीलसह नगरसेवकांनी ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला.
मनपा हिरवळीवर आयुक्तांचा सत्कार सोहळा पार पाडला तर बग्गीतून महापौर आबुटे व आयुक्तांची मिरवणूक निघाली. स्मार्ट सिटीत शहराचा समावेश झाल्याची घोषणा झाल्यानंतर महापौर आबुटे तातडीने मनपा आयुक्त कार्यालयात गेल्या आणि आयुक्तांचा सत्कार केला. नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. उपमहापौर प्रवीण डोंगरे हे धावत मनपात आले आणि आयुक्तांना उचलून घेत आनंद व्यक्त केला. नगरसेवक िदलीप कोल्हे यांनी ढोल-ताशा मागवत ठेका धरला. कच्छी जैन समाजाच्या वतीने चंदूभाई देढीया यांनी मनपा आयुक्तांचा सत्कार केला. नगरसेवक पीरअहमद शेख, कोल्हे, चंदनशिवे यांनी ठेका धरला.
पुढील स्लाईडवर वाचा, कोणत्या बाबींमुळे झाला स्मार्टसिटीत समावेश व इतर सविस्तर बातमी