सोलापूर- मोहोळ ते वाकावदरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणानंतर विक्रमी वेळेत नॉन इंटरलॉकिंगचे काम पूर्ण केले आहे. तब्बल ५०० मजुरांच्या मदतीने केवळ एका दिवसांत तीन स्थानकांचे लूपलाइन, टर्न आऊटचे महत्त्वपूर्ण काम पूर्ण करण्यात आले. स्टेशन कनेक्शनचे काम रविवारी पूर्ण झाले असून, सोमवारपासून सोलापूर ते वाकावदरम्यान रेल्वेगाड्या दुहेरी मार्गावरून धावतील. परिणामी गाड्यांचे क्रॉसिंग टळतील. यामुळे प्रवाशांचा १० ते १५ मिनिटांचा वेळ वाचेल.
पाचशे कामगार आणि अधिकाऱ्यांचा ताफा काम करत होता. काम झाल्यानंतर सर्व यंत्रणेची तपासणी करण्यात आली. कमी वेगात मालगाड्याही सोडण्यात येऊन कामाची खातरजमा करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने ते फेब्रुवारीपर्यंत नॉन इंटरलॉकिंगचे काम पूर्ण करण्यासाठी रोज तीन ते चार तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. प्रवाशांची कमीत कमी गैरसाेय व्हावी म्हणून १२ गाड्या रद्द केल्या तर १८ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. नॉन इंटरलॉकिंगमुळे मोहोळ, वाकाव, मलिकपेठ, अनगर या छोट्या स्थानकांवर टर्न आऊट लूपलाइन तसेच सिग्नल यंत्रणेची कामे करण्यात आली. या कामामुळे आता गाड्यांना या स्थानकाच्या फलाटावर थांबता येईल.
दुहेरीकरण झालेला मार्ग वापरात येणार असल्याने रेल्वे वाहतूक दुहेरी होईल. पूर्वी सोलापूर ते मोहोळपर्यंतच गाड्या दुहेरी मार्गावरून धावत. आता मात्र गाड्या वाकावपर्यंत धावतील. जवळपास २३ किमीचा मार्ग वापरात येणार आहे. तसेच उर्वरित कामास लवकरच सुरुवात होणार आहे. दिवसभरात विशेषकरून रात्रीच्या वेळी गाड्या क्रॉसिंगला थांबल्यानंतर गाडी लुटण्याचे दगडफेकीचे प्रकार घडतात. आता मात्र सोलापूर ते वाकवदरम्यान धावणाऱ्या गाड्यांना क्रॉसिंगसाठी थांबावे लागणार नाही.
विक्रमी वेळेत काम
रेल्वेप्रशासनानेविक्रमी वेळेत हे काम पूर्ण केले आहे. गाड्या आता दुहेरी मार्गावरून धावतील. परिणामी गाड्यांना क्रॉसिंगला थांबावे लागणार नाही. प्रवाशांचा दहा ते पंधरा मिनिटांचा वेळ वाचेल.” मनिंदरसिंगउप्पल, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर