आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या टप्प्यात लिंगायतऐवजी पद्मशाली समाजाचा महापौर? भाजपच्या वर्तुळात चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भाजपकडून महापौरपदाची पहिली अडीच वर्षे पद्मशाली समाजाला आणि उरलेली अडीच वर्षे लिंगायत समाजाला मिळणार असल्याची चर्चा आहे. सुरुवात महिलांसाठी राखीव असून श्रीकांचना यन्नम यांचे नाव चर्चेत आहे. त्यांना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे. तर पद्मशाली समाजाला संधी देण्याच्या खेळी मागे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आहेत. दुसऱ्या टर्मध्ये त्यांना आपला मुलगा किरण देशमुख यांची वर्णी लावायची असल्याची चर्चा आहे. 
 
महापौर पदासाठी सुरुवातीला लिंगायत समाजाच्या शोभा बनशेट्टी यांच्या नावाची चर्चा होती. मात्र पालकमंत्र्यांच्या चिरंजीवांसाठी त्यांचा पत्ता कट झालेला आहे. पालकमंत्र्यांना आपला विधानसभा मतदारसंघ सुध्दा सांभाळायचा आहे. त्यामुळे एका दगडात दोन पक्षी मारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यन्नम यांना संधी देऊन पद्मशाली समाजाला खुश करण्याचा डाव आहे. तसेच सहकारमंत्रीही नाराज होणार नाहीत. 
 
धनगर समाजातून अंबिका पाटील यांचे नावही चर्चेत आहे. सर्वाधिक मताधिक्याने त्या निवडून आल्या आहेत. भाजपमधील गटबाजीचे राजकारण अधिक तापले की बसल्या ठिकाणी त्यांना लॉटरी लागण्याची शक्यता आहे. 
 
स्थायी सभापतिपदी सुरेश पाटील? 
नगरसेवक सुरेश पाटील यांना स्थायी समिती हवी आहे. पालकमंत्र्यांच्या जवळचे शिवानंद पाटील हेही इच्छुक आहेत. जर यन्नम महापौर झाल्या तर शिवानंद पाटील यांचे नाव बाजूला पडेल. एकाच प्रभागात दोन पदे देण्याची शक्यता कमी आहे. तसेच नागेश वल्याळ आणि संजू कोळी यांच्या नावाची चर्चा आहे. सुरेश पाटील पक्षनेता झाले तर संजू कोळी यांचा पत्ता कट होणार नागेश वल्याळ यांना स्थायीची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
बातम्या आणखी आहेत...