आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गर्दी आेसरली, ताण कमी झाला; आता पाचशेच्या नोटांची प्रतीक्षा,

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पाचशे आणि हजारांच्या नोटा रद्द झाल्यानंतर बँकांवर प्रचंड ताण पडला होता. नोव्हेंबरपासून २० नोव्हेंबरपर्यंत स्थितीत फारसा फरक नव्हता. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रोज नवीन नियम काढले. बोटावर शाई आली, खात्यावरच पैसे जमा करण्याचे निर्देश आले. लग्नकार्यासाठी काढण्यात येणाऱ्या पैशासाठी निर्बंध घातले. शेवटी दुसऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केल्यास वर्षांची शिक्षा होणार असल्याचे फर्मान काढले. या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवत आयकर खातेही सक्रिय झाले. दुसरीकडे स्टेट बँकेने उत्तम कामगिरी केली. सुमारे साडेसहाशे कोटी रुपये साेलापूरकरांच्या हाती देत, गरजूंपर्यंत जाण्याचे उपक्रमही राबवले. परिणामी बँकांसमोरील गर्दी बऱ्यापैकी आेसरली. ताण कमी झाला. अाता पाचशेच्या नोटांची प्रतीक्षा आहे. शुक्रवारी (ता. २५) रिझर्व्ह बँकेकडून ३०० कोटी रुपयांच्या या करकरीत नोटा येण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही दिवसांतच चलन तुटवडा संपुष्टात येईल, असे अधिकारी म्हणतात.
-----------------
रेल्वे कर्मचाऱ्यांना १० हजार अॅडव्हान्स
सोलापूर रेल्वेप्रशासन आपल्या कर्मचाऱ्यांना पगारातील १० हजारांची रक्कम अॅडव्हान्स म्हणून देत आहे. मात्र ही रक्कम हजारांच्या नोटाच्या रुपात देण्यात येत आहे. सुट्टे पैसे मिळत नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. सोलापूर विभागात १० हजार कर्मचारी आहेत. यातील ९० टक्याहून अधिक कर्मचाऱ्यांनी रक्कम स्वीकारली. आतापर्यंत अॅडव्हान्सच्या रुपाने १० कोटी लाख रुपयांचे वाटप झाले असल्याचे वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक चंद्रशेखर यांनी सांगितले.
-----------------
मोबाइल एटीएमची केगाव, कुंभारीत सेवा, ७५ महिला पाेलिस प्रशिक्षणार्थींनी घेतला लाभ
सोलापूर - गरजूंपर्यंतपैसे नेण्याचा उपक्रम म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाने मोबाइल व्हॅन एटीएम सुरू केले आहे. मंगळवारी दुपारी केगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात ही सेवा देण्यात आली. त्याचा ७५ युवतींनी लाभ घेतला. दीड लाख रुपये त्यांना देण्यात आले. त्यानंतर राज्य राखीव दलाच्या सोरेगाव येथील स्थळावर ही व्हॅन पोचली. तिथे ६० जवानांनी लाख रुपये घेतले. त्यानंतर ही व्हॅन कुंभारीत (ता. दक्षिण सोलापूर) गेली. अचानक आलेल्या या व्हॅनमुळे गावकऱ्यांची पळापळ झाली. परंतु बहुतांश पुरुष मंडळी कामावर गेले होते. एटीएम कार्ड त्यांच्याकडेच होते. तिथल्या ग्रामसेवकाने बुधवारी सकाळी येण्याची विनंती केली. ती मान्य झाल्यानंतर गावात चक्क दवंडी देण्यात आली.

पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द झाल्यानंतर त्या बदलून घेण्यासाठी, खात्यावर जमा करण्यासाठी ग्राहकांची प्रचंड झुंबड उडाली होती. सोमवारपासून ती काही प्रमाणात आेसरली. परंतु एटीएम केंद्रे अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. स्टेट बँक आणि काही खासगी बँकांची बोटावर माेजण्याइतकीच केंद्रे सुरू आहेत. परंतु, ग्राहकांची गरज भागत नाही. सुरू असलेल्या केंद्रांवर ग्राहकांची रांग दिसून येते. अशा स्थितीत रिझर्व्ह बँकेने नोटा बदलून देण्याचे काम थांबवले आहे. पण पोस्ट कार्यालयांना त्याची मुभा दिली आहे.

दुसरे काय देणार?
^बँकांमध्येनव्यापाचशेच्या नाेटाच आल्या नाहीत. बँका आणि एटीएम केंद्रातून दोन हजारच्या नोटाच मिळाल्या. काही प्रमाणात शंभरच्या नोटाही मिळाल्या. परंतु त्या सर्वांनाच देणे शक्य नव्हते. बहुतांश कामगारांच्या हाती दोन हजाराची नोटच दिली.'' मल्लिकार्जुनकमटम, कारखानदार

शासनाकडून आदेश नाहीत
^कर्मचाऱ्यांचेवेतनरोख स्वरूपात देण्याबाबत शासनाकडून कोणत्याही सूचना, आदेश अद्याप जिल्हा परिषदेला मिळाले नाहीत. जिल्हा परिषदेतील किमान ९० टक्यांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे वेतन ग्रामीण भागातून होते. फक्त मुख्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन येथून होते. रोख वेतनाबाबत शासनाकडून आदेश मिळाल्यास त्याबाबत नियोजन करण्यात येईल. गौतमजगदाळे, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी

येत्या शुक्रवारी पाचशेच्या नव्या नोटा येतील
^जुन्यानोटारिझर्व्ह बँकेकडे पाठवल्या आहेत. त्यानंतर शुक्रवारपर्यंत (दि.२५) आणखी काही नोटा येतील. त्यात पाचशेच्या नव्या नोटा येण्याची शक्यता आहे. ही रक्कम आली तर स्थितीत बरीच सुधारणा होईल. सध्या जाणवणारा चलन तुटवडाही संपुष्टात येईल.'' सुहासगंडी, मुख्य व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया
---------------------------
अर्धवेतन रोखीने द्या : कर्मचारी संघटना
सोलापूर बँकांमध्ये पैसे बदलून घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना अर्थव्यवस्था सुरळीत होईपर्यंत निम्मे वेतन रोख स्वरूपात द्यावे, अशी मागणी कर्मचारी संघटनेतर्फे लेखा वित्त अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. कर्मचाऱ्यांचे वेतन थेट बँकेत जमा होते. पण, त्या ठिकाणी लोकांच्या रांगा आहेत. 'एटीएम' सेवा सुरळीत नसल्याने कर्मचाऱ्यांना वेतन झाल्यावर अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे किमान अर्धवेतन रोख स्वरूपात मिळाल्यास कर्मचाऱ्यांची गैरसोय होणार नाही. वेतनानंतर पैसे काढण्यासाठी प्रशासकीय कामकाज सोडून बँकेच्या रांगांमध्ये उभारणे कर्मचाऱ्यांना शक्य नाही. त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांचे अर्धवेतन रोख स्वरूपात द्यावे, अशी मागणी बहुतांश कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचे, कर्मचारी युनियनचे प्रदेश सचिव विवेक लिंगराज यांनी सांगितले.
-------------------------
अखेर यंत्रमाग कामगारांच्या हाती मिळाली दोन हजारची नोट
सोलापूर -
चलन तुटवड्यामुळे गेल्या मंगळवारी यंत्रमाग कामगारांना अपुरी मजुरी मिळाली होती. या आठवड्याची मजुरी म्हणून दोन हजार रुपयांची नोटच हाती पडली. आता बाजारात सुट्या पैशांसाठी फिरावे लागणार अाहे. शंभरच्या नोटांचा प्रचंड तुटवडा आहे. त्या मिळवण्यासाठी कामगारांना आता मोठीच खरेदी करावी लागेल.

यंत्रमाग कामगारांना दर मंगळवारी आठवड्याची मजुरी देण्यात येते. नोटाबंदीची घोषणा झाली तो दिवस मंगळवारचा होता. रात्री आठलाच त्याची घोषणा झाली. तत्पूर्वी कामगारांच्या हाती रद्द झालेल्या नोटा पडलेल्या होत्या. त्या घेऊन दुसऱ्या दिवशी कामगार मंडळी बँकांसमोरच्या रांगेत उभी होती. सुटीचा दिवस गेला. त्यानंतर पुढील आठवडाभरही चलन तुटवडा जाणवला. त्यामुळे गेल्या मंगळवारची तुटपुंजी मजुरी घेतली. या मंगळवारी उर्वरित आणि चालू आठवड्याची मजुरी म्हणून दोन हजराची नोटच हाती पडली.
-----------------------------------
बातम्या आणखी आहेत...