आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पूर्वतयारीशिवाय नोटाबंदीच्या त्रासाविरुद्ध काँग्रेसचा आक्रोश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी एक हजार ५०० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाच्या विरोधात सोमवारी काँग्रेसतर्फे जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. आगामी निवडणुकीसाठीच्या इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन केले.

आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि.२८) चार हुतात्मा पुतळ्यापासून आंदोलनास सुरवात झाली. कार्यकर्ते जमविण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांची सकाळपासून धावपळ सुरू होती. साडेअकरा वाजता मोर्चाला सुरवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सिद्धेश्वर मंदिर, पंचकट्टामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निदर्शने करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी आमदार निर्मला ठोकळ, दिलीप माने, माजी खासदार धर्मण्णा सादूल, अॅड. यू. एन. बेरिया, प्रदेश सरचिणीस धर्मा भोसले, अलका राठोड, विनोद भोसले, बाबा करगुळे, सरचिटणीस राहुल गायकवाड, संजय हेमगड्डी, अमोलबापू शिंदे, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, प्रवक्ते ए. डी. चिनीवार, शर्मिला देशमुख, करिमुन्नीसा बागवान, सुमन जाधव, गणेश डोंगरे, जाबीर अल्लोळी, सुनील रसाळे, माणिकसंग मैनावाले, हाजीमलंग नदाफ, तौफिक हत्तुरे, अंकुश गायकवाड, रॉकी बंगाळे, अनिल वाघमारे आदी उपस्थित होते.

आमदार शिंदे म्हणाल्या, 'केंद्राने काळ्या पैशाच्या नावाखाली पाचशे हजारांच्या नोटांवर बंदी घालून सामान्य माणसाला पै-पै साठी रस्त्यावर आणले. याचा सर्वाधिक फटका हातावरचे पोट असलेल्या यंत्रमाग विडी कामगार, गरीब शेतकरी सर्वसामान्य नागरिक यांना बसला. जनआक्रोश मोर्चाद्वारे जनतेच्या हितासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. पंतप्रधान टीव्ही, रेडिओवर बोलतात. मात्र नोट बंदी विषयांवर संसदेत येऊन बोलायला तयार नाहीत.'

माजी आमदार माने म्हणाले, 'विदेशातील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात भरतो अशी बतावणी पंतप्रधान मोदी करीत होते. पण, प्रत्यक्षात त्यांनी नोटबंदी करून गरिबांच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारणे सुरू केले. सर्वसामान्यांना लग्नासाठी, मुलांचे शिक्षण, शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी पैसे मिळत नसून स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी निर्णय घेतला आहे.'
शहराध्यक्ष खरटमल म्हणाले, या नियोजनशून्य नोटबंदीमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत असून योग्य ते नियोजन केल्यास यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

सामान्यांना का छळता?
नोटाबंदीनंतरसामान्यकामगारांची मजुरी बंद झाली. त्यांना उधार, उसनवारी करावी लागते. दुसरीकडे बडे भांडवलदार निश्चित आहेत. त्यांच्याकडे बँकांची मोठ्या प्रमाणात कर्जे थकीत आहेत. त्याची वसुली होत नाही. ही स्थिती पाहता, सामान्यांना छळण्यासाठीच नोटाबंदी केली का, असा प्रश्न पडतो.'
- सिद्धप्पाकलशेट्टी, माकपचे ज्येष्ठ नेते

नोटाबंदीमुळे जनतेला होत असलेल्या त्रासाविरुद्ध काँग्रेसने सोमवारी आक्रोश मोर्चा काढला.
जल्लोष करताना प्रा. नरेंद्र काटीकर, विलास शहा, चंदूभाई देढीया, डॉ. इरेश स्वामी, द. म. कन्नूरकर, बाबूराव पेठकर, एम. व्ही. सोलापुरे, प्रा. गणेश मडिवाल, चिदानंद मुस्तारे, राजेंद्र पटेल, कॅ. बिलाल शेख, उदय आळंदकर, प्रा. शेखर साळुंखे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या वाट पाहाच्या निरोपाने कार्यालयात पदाधिकाऱ्यांनी घातला गोंधळ
मोर्चाचेशिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचले. मात्र, जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये असल्याने वाट पाहण्यास सांगण्यात आले. संतापलेल्या महापौर सुशीला आबुटे यांनी कक्षाचा दरवाजा जोराने अादळत घोषणाबाजी केली. 'तुम्ही आमचे निवेदन वेळेत का स्वीकारत नाहीत?' असा सवाल करत शहराध्यक्ष सुधीर खरटमल, माजी आमदार निर्मला ठोकळ यांनीही जाब विचारला. माजी आमदार दिलीप माने यांनी मध्यस्थी करीत निवेदन स्वीकारण्याची विनंती केली. बेशिस्त वर्तणुकीबाबत जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी नाराजी व्यक्त केली.
इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन
जनआक्रोश मोर्चाच्या निमित्ताने आगामी महापालिकेच्या इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन केले. कार्यकर्त्यांच्या सोबतीने नगरसेवक इच्छुकांनी जोरदार घोषणाबाजी करीत शक्तिप्रदर्शन केले. त्यामध्ये प्रामुख्याने तरुण कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती.
'बंद' नाही, दुकाने सर्वत्र सुरू, माकप नेत्यांना अटक, सुटका
सोलापूर नोटाबंदीच्यासमर्थनार्थ विविध संघटनांचा चार पुतळा परिसरात जल्लोष झाला. टेक्नोक्रॅट सेल, ज्येष्ठ नागरिक संघटना, प्राणीमित्र संस्था, गोपालक संस्था, माजी सैनिक संघटना, पर्यावरण रक्षण संस्था, पतंजली योग समिती, जलसंवर्धन रक्षण समिती, महिला युवक मंडळ प्रतिनिधी उपस्थित होते.
सोलापूर नोटाबंदीनंतरउद््भवलेल्या स्थितीवर तातडीने उपाय करण्याच्या मागणीसाठी डाव्यांनी सोमवारी 'भारत बंद'ची हाक दिली होती. सोलापुरात त्याला शून्य प्रतिसाद मिळाला. सर्वत्र दुकाने सुरूच होती. भाजप कार्यकर्त्यांनी काही ठिकाणे 'आम्ही दुकाने सुरूच ठेवणार' असा फलक घेऊन उभे होते.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दत्तनगर येथील कार्यालयाजवळ सकाळी ११ वाजता जाहीर सभा झाली. त्यानंतर नेते आणि कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्यासाठी दत्तनगर चौकाकडे कूच केली. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून शंभरच्या वर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. जमावबंदीच्या गुन्ह्याखाली त्यांना अटक केली. नंतर सुटकाही केली. त्यानंतर सारे काही सुरळीत होते. 'बंद'चा कुठेच परिणाम जाणवला नाही.
माकपचेनेते आेरिसात
माकपचेलढाऊ नेते नरसय्या आडम आणि 'सीटू'चे प्रदेश सचिव अॅड. एम. एच. शेख पुरी (आेरिसा) येथील पक्षाच्या महाअधिवेशनाला गेले. त्यामुळे बंदची तयारी करण्यात दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते कमी पडले. सिद्धप्पा कलशेट्टी, मुरलीधर सुंचू, शेवंता देशमुख, अशोक बल्ला आणि अनिल वासम यांनी मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन दत्तनगरात सभा घेतली. त्यानंतर 'रास्ता रोको' करण्याचा प्रयत्न केला.
बातम्या आणखी आहेत...