आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापुरात पांढरे मोर आणण्याचा मार्ग खुला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महात्मा गांधी प्राणी संग्रहालयात पांढरे मोर आणण्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. चेन्नई येथील आरीगनार प्राणी संग्रहालयाने विनाशर्त पांढरे मोर देण्याचे मान्य केले आहे. केंद्र आणि राज्याची मंजुरी मिळताच सोलापुरात पांढरे नर आणि मादी मोर दाखल होणार आहेत.
सोलापुरातील प्राणी संग्रहालयाची शोभा वाढवण्यासाठी येथील प्रशासनाने चेन्नई, इंदौर आणि विशाखापट्टणम् या तीन ठिकाणच्या प्राणी संग्रहालयांशी पत्रव्यवहार करून पांढऱ्या मोरांची मागणी केली होती. चेन्नईच्या प्राणी संग्रहालयाने याची दखल घेतली आहे.

एका प्राणी संग्रहालयातील पक्षी किंवा प्राणी द्यायचे असेल तर ज्यांना देतो त्यांच्याकडून बदल्यात पक्षी किंवा प्राणी घ्यायचे असा नियम आहे. सोलापूर प्राणी संग्रहालयात मगर, हरीण, सांबर, माकड हे प्राणी आहेत. चेन्नईच्या प्राणी संग्रहालयातही हे प्राणी आहेत. त्यामुळे भविष्यात प्राणी, पक्ष्याची आवश्यकता असल्यास घेऊ, अशा आशयाचे पत्र पाठवले आहे.

उरली शासन मान्यता
^आम्ही तीन ठिकाणी पांढऱ्या मोरांची मागणी केली होती. चेन्नईने विनाशर्त मंजुरी दिली. आता केंद्र आणि राज्याची मंजुरी मिळताच पांढरे मोर सोलापुरात आणू. त्यासाठी भरपूर जागा आणि सुविधा आहेत. काही सुविधा करून घेण्यात येतील. डाॅ.पंकज रापतवार, प्राणी संग्रहालय प्रमुख
अशी आहे प्रक्रिया

पत्रमिळताच सोलापूर प्राणी संग्रहालय प्रशासनाने केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण आणि महाराष्ट्र मुख्य वनसंरक्षक नागपूर यांना पत्र पाठवले. या विभागाची चार महिन्यांतून एकदा बैठक होत असते आणि या बैठकीत अशा पत्रांना मंजुरी देण्यात येते. तसेच मंजुरी पत्रासह ते प्राणी कशा पद्धतीने घेऊन जायचे, त्यांचा सांभाळ कशा रीतीने करावा आदी सूचना देण्यात येतात. मंजुरीनंतर मोर घेऊन जाण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात येतो. चेन्नई येथील मंजुरीनंतर पुढील प्रक्रियेत सहसा अडचण येत नाही. त्यामुळे सोलापूरला पांढरे मोर आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.