आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\"अतिरेकी\' पकडायला गेले अन् बूट काढत बसले\', मोहिमेच्या थराराचा उडाला फज्जा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून सोलापुरात शनिवारी सायंकाळी दोन ठिकाणी मॉकड्रील तर नऊ ठिकाणी घातपात विरोधी तपासणी करण्यात आली. यावेळी श्री मार्कंडेय मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी शस्त्रधारी पोलिस बुट काढत बसल्यामुळे मोहिमेचा थरार निघून गेला.

सायंकाळी पाच वाजता सात रस्ता येथील बिग बझार येथे घातपात विरोधी तपासणी आणि मॉकड्रील करण्यात आले. यानंतर श्री मार्कंडेय मंदिर येथे मॉकड्रील केले. मॉकड्रील करण्यापूर्वी बिग बझार आणि मंदिरातील संबंधितांना कळवण्यात आले होते. अचानक आलेले पोलिस, तपासणी पथक, शस्त्रधारी पोलिस यांची रंगीत तालीम पाहून अनेकांची घाबरगुंडी उडाली. काय सुरू आहे हे कोणाला समजलेच नाही. काही वेळाने हे मॉकड्रील असल्याचे समजल्यानंतर बघ्याची गर्दी केलेल्यांनी मोबाइलमध्ये ते दृश्य टिपले.

श्री मार्कंडेय मंदिरात मॉकड्रील करण्यात आले.यावेळी शस्त्रधारी पोलिस टप्प्या टप्प्याने पण सावधपणे प्रवेश करत होते परंतू आत जाण्यापूर्वी पोलिसांनी बूट काढल्यामुळे मोहिमेचा संपूर्ण थरार निघून गेला.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, आणखी फोटो