आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर-पुणे शिवनेरीला दसऱ्याचा मिळाला मुहूर्त,

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- दसऱ्याच्या मुहूर्तावर सोलापूर-पुणे वातानुकूलित एसटी (शिवनेरी) सेवा सुरू होत आहे. गुरुवारी परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते या बससेवेचा प्रारंभ होईल. दोन वर्षांपासून या सेवेची प्रतीक्षा होती. आता अवघ्या पावणेचार तासांत बसने पुण्याला पोहोचता येणार आहे. या बसच्या दररोज तीन फेऱ्या असतील. ही गाडी स्वारगेट बसस्थानकापर्यंत जाणार आहे. या गाडीचा तिकीट दर ६४७ रुपये आहे.
दोन वर्षांपूर्वी सोलापूर एसटी विभागाने सोलापूर-पुणे दरम्यान शिवनेरी गाडी सुरू करावी असा प्रस्ताव एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाला पाठवला होता. तो मंजूर झाला आहे. गुरुवारी दुपारी वाजता सोलापूर बस स्थानकावर या सेवेचे उद््घाटन होणार आहे. यावेळी िवभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी आदी अधिकारी उपस्थित असतील.

सुमारे ९० लाख रुपये किमतीच्या या गाडीत प्रवाशांना आरामदायक आसन, पाण्याची बाटली, एक वर्तमानपत्र मोफत देण्यात येणार आहे. प्रवास आरामदायक व्हावा, अशी सीटची रचना आहे. सोलापुरातून वातानुकूलित सेवा देणारी एसटीची ही पहिली गाडी असणार आहे.

शिवनेरी महत्त्वाच्या शहरात
राज्यातसध्या ३० ते ४० शिवनेरी गाड्या आहेत. प्रामुख्याने मुंबई -पुणे महामार्गावर या गाड्या धावतात. तसेच पुणे-नाशिक, पुणे -कोल्हापूर, पुणे-औरंगाबाद या शहरांना जोडण्यास शिवनेरीची सेवा सुरू आहे.

हुतात्माचुकली तर शिवनेरी
सोलापूरहूनहुतात्मा एक्स्प्रेस सकाळी ६.३० वाजता निघते. ज्यांची हुतात्मा चुकेल अशांना शिवनेरीने प्रवास करता येईल. शिवनेरी सकाळी सात वाजता सोलापूर बस स्थानकावरून सुटेल आणि साडेदहा ते पावणेअकराच्या सुमारास स्वारगेटला पोहचेल. टेंभुर्णी, इंदापूर हडपसर या तीन ठिकाणी शिवनेरीला येता -जाता थांबा देण्यात आला.
शिवनेरीच्या वेळा सकाळी७, दुपारी १२, सायंकाळी