आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुळे सोलापुरात स्वतंत्र स्थानकासाठी रेल्वेमंत्र्यांकडे साकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दक्षिण भारताला जोडणारे प्रमुख रेल्वे स्थानक म्हणून सोलापूरकडे पाहिले जाते. त्यामुळे या रेल्वे स्थानकाचा विकास होणे अपेक्षित आहे. शहरातील विजापूर रोड आणि होटगी रोडच्या बाजूकडील विस्तार पाहता या भागाला जोडणाऱ्या जुळे सोलापूरला स्वतंत्र रेल्वे स्थानक होणे गरजेचे आहे. नागरिकांच्या दृष्टीनेही ते सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे सोलापूरला आणखी एक रेल्वे स्थानक करण्यासाठी प्रयत्न होण्याचे साकडे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना घातले.

मंगळवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी रेल्वेमंत्री प्रभू यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी रेल्वेच्या संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन रेल्वेमंत्र्यांना दिले. गेल्या आठवड्यात लासलगाव कांदा प्रश्न निकाली काढण्यासाठी सहकारमंत्री देशमुख यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा केली होती. महिन्यातील ही त्यांची दुसरी भेट ठरली. दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा या वर्षी सोलापुरात भरवण्यात याव्यात, त्यासाठी आपण पुढाकार घेऊ. जेणेकरून सोलापूर क्रीडारसिकांना फायदा होईल, अशी मागणीही देशमुख यांनी यावेळी केली. यावेळी रेल्वेसंदर्भात विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
पुढील स्‍लाइडवर वाचा, कोणत्‍या आहेत मागण्‍या.....
बातम्या आणखी आहेत...