सोलापूर - सोलापूररेल्वे स्थानकावर एकूण पाच फलाट आहेत. फलाट क्रमांक एकवरून अन्य फलाटवर जाणाऱ्या पादचारी पुलावर फलाट मार्गदर्शक फलक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. कोणती गाडी कोणत्या फलाटावर येत आहे, हेच प्रवाशांना समजत नसल्याने फसगत होतेय.
सोलापूर रेल्वे स्थानकावर दोन पादचारी पूल आहेत. एक पुणेच्या दिशेने तर दुसरा वाडीच्या दिशेने. फलाट क्रमांक वरून पादचारी पुलावर अाल्यानंतर फलाट क्रमांक दोन तीनवर जायचे असल्यास फलाट मार्गदर्शक फलकच नाही. पुण्याच्या दिशेने असलेल्या पादचारी पुलावर आल्यानंतर आपणास पटकन काहीच समजत नाही. येथे कोच ट्रेन डिस्पलेही नाही. हीच परिस्थीती वाडीच्या दिशेने असलेल्या पादचारी पुलाची आहे. येथे फलाट दोन तीनकडे जाणारा मार्गदर्शक फलक नाही. पूर्वी फलाट तीनकडे जाणाऱ्या जिन्याजवळ ट्रेन कोच डिस्पले होते. तेही आता येथून गायब झाले आहेत.
डबाआणि फलाटातील अंतर जीवघेणे :सोलापूर रेल्वे स्थानकावरील रेल्वे आणि फलाट यांच्यात अंतर जास्त असल्याने अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यात पाय अडकून काही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे प्रशासनाने डबा आणि फलाट यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी योग्य ते उपाय योजायला हवेत.
^ चांगल्या पद्धतीचे बोर्ड बसविण्यात येतील. तसेच, कोच ट्रेन डिस्पले तत्काळ लावण्यात येतील. के.व्ही.थॉमस,वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक.
रॅम्पमुळे प्रवाशांची दमछाक
फलाट क्रमांक पाचकडे जाणारा रॅम्प हा इतका मोठ्या लांबीचा आहे. तो उतरताना चढताना अनेक प्रवाशांची दमछाक होते. गरज नसताना त्यांची लांबी वाढवल्याने प्रवाशांची पायपीट होते. सोलापूर -पुणे पॅसेंजर, सोलापूर -मुंबई एक्स्प्रेस आदी गाड्या चार अथवा पाच क्रमांकावर लागतात. गाडीत चढण्यासाठी प्रवाशांना रॅम्पवरून जाणे भाग पडते.
सोलापूर रेल्वे स्थानकावरील वाडीच्या दिशेने असलेल्या पादचारी पुलावर फलाट मार्गदर्शक बोर्ड नाही. त्यामुळे प्रवाशांची फसगत होते. तसेच, पूर्वी येथे असलेला ट्रेन कोच डिस्पेले बोर्डही काढून टाकल्याने कोणती गाडी कोणत्या फलाटावर येत आहे हेच प्रवाशांना समजत नाही.