आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूर रेल्वे स्थानकाची सफाई होतेय आता यंत्राच्या सहाय्याने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर रेल्वे स्थानक चकाचक दिसावे. फलाटावर अॅपरन स्वच्छता असावी यासाठी रेल्वे प्रशासनाने आधुनिक यंत्राचा वापर सुरू केला आहे. कोईम्बतूरहून स्वच्छता करणारी यंत्रे सोलापूर स्थानकावर आली असून आता २४ तास स्थानकावर स्वच्छता केली जात आहे. कमीत कमी वेळेत तसेच कमीत कमी पाण्याचा वापर करून स्वच्छता करण्यात येत आहे.
सोलापूर स्थानकावर पहिल्यांदाच बॅटरी ऑपरेटेेड स्क्रबिंग ब्रश, हाय प्रेशर जेट मशिन, बॅटरी ऑपरेटेड गार्वेज आदी अदयावत मशिन नुकतेच स्थानकावर उपलब्ध झाले आहे. फलाट स्वच्छ करताना स्क्रबिंग ब्रशच्या मदतीने ते चांगले पुसले जाते. फलाटावरील फरशीवर पडलेले डाग स्वच्छ करण्यासाठी हे फार महत्वाचे ठरत आहे. फरश्यांवर पाणी टाकण्याचे कामदेखील हे मशिन करतेय. गाड्या फलाटावर थांबल्यानंतर प्रवाशांकडून शौचालयाचा वापर होतो. त्यामुळे अॅपरनवर अस्वच्छता निर्माण होते. अॅपरनवर स्वच्छता राखण्यासाठी हाय प्रेशर जेट मशिनचा वापर केला जात आहे. सोलापूर रेल्वे विभागात सोलापूरसह, गुलबर्गा, कोपरगाव, साईनगर शिर्डी, वाडी आदी स्थानकावर या यंत्राच्या मदतीने स्वच्छता राखण्यात येत आहे, असे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनिदरसिंग उप्पल यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...