आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निधीच्या कमतरतेमुळे होतोय कामास विलंब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर रेल्वे स्थानकावर दोन लिफ्ट बसविण्याची परवानगी मिळाली खरी. मात्र अद्याप लिफ्टच्या डिझाईनला मान्यता मिळाली नाही. लिफ्टच्या डिझाईनसह लिफ्ट उभारण्याचे कामदेखील रखडले आहे.
ज्येष्ठ नागरिक गर्भवती महिलांची सोय व्हावी या हेतूने सोलापूर रेल्वे स्थानकावर दोन ठिकाणी लिफ्ट बसविण्यास मंजुरी मिळाली. पैकी एका लिफ्टचे काम सुरू झाले. फलाट दोन तीन क्रमांकावर आठ ते दहा फुटांचा खड्डा घेतला. सुरुवातीला लिफ्टचे डिझाइन तयार करण्यास नंतर ते डिझाईन मंजूर करून घेण्यात दोन महिन्याहून जास्तीचा काळ गेला. मात्र अद्याप लिफ्टचे काम सुरू झाले नाही. तांत्रिक बाबीमुळे सोलापूर रेल्वे स्थानकावरील लिफ्टचे काम रखडले आहे.

सोलापूर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक फलाट दोन तीन क्रमांकाच्या मध्ये लिफ्ट बसविण्यात येणार आहे. मागील दोन ते तीन महिन्यापासून फलाट दोन तीनच्या मधोमध लिफ्टचे काम सुरू झाले. यासाठी मोठा खड्डा मारला गेला. सोलापूर रेल्वे प्रशासनाने तयार केलेले डिझाईन मागील महिन्यात तपासणीसाठी पुणे येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाकडे पाठविण्यात आले. अद्याप ते रेल्वे प्रशासनाला मिळाले नाही. त्यामुळे लिफ्टचे डिझाईन कामदेखील रखडले आहे.

सोलापूर स्थानकावरील पोर्चचे डिझाईन तपासण्याचे काम याच महाविद्यालयाकडे देण्यात आले होते. येत्या काही दिवसात महाविद्यालयाकडून पोर्चच्या डिझाइनला मंजुरी मिळेल, अशी आशा रेल्वे प्रशासनाला आहे. यानंतरच लिफ्टच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात होईल.

^रेल्वेने तयारकेलेल्या लिफ्टच्या डिझाईनमध्ये काही त्रुटी तर नाहीत ना हे तपासण्यासाठी ते डिझाईन पुण्यातील शासकीय महाविद्यालयाकडे पाठवून देण्यात आले आहे. मंगळवारी त्यांच्याकडून डिझाईनला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. निधी प्राप्त होताच पोर्चच्या कामास सुरुवात होईल. काम लवकर संपविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. -श्रीरंगकांबळे, वरिष्ठ विभागीय बांधकाम अभियंता, सोलापूर.
बातम्या आणखी आहेत...