आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे स्थानक दुमजली करण्याचा ‘स्मार्ट’ प्रस्ताव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर रेल्वे स्थानक स्मार्ट बनवताना स्थानकाची मुख्य इमारत दुमजली करावी. प्रस्तावित उड्डाणपुलाला म. गांधी पुतळ्याजवळ उतार देऊन तो थेट जुन्या मालधक्याच्या जागी जोडावा. त्यामुळे सातरस्त्याहून येणाऱ्या प्रवाशांच्या वाहनांना मालधक्याच्या जागी लावता येईल. थेट स्थानकावर जाता येईल. सोलापूर रेल्वे विभाग सध्या या प्रस्तावावर काम करत आहे. लवकरच तो केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडे पाठवला जाणार आहे.
रेल्वे मंत्रालय नगरविकास मंत्रालय यांच्यात नुकताच स्मार्ट शहरातील रेल्वे स्थानक स्मार्ट करण्यासाठी करार झाला. त्याप्रमाणे सोलापूर रेल्वेस्थानक स्मार्ट बनवले जाणार आहे. सोलापूर स्थानकांत काय बदल करावेत, कोणत्या प्रवासी सुविधा देण्यात याव्यात आदी बाबींचा विचार केला जाणार आहे.

स्थानकाच्या मुख्य इमारतीत मोठा बदल करून त्याच्या वरच्या मजल्यावर रेल्वे आरक्षण केंद्र, बुकिंग ऑफिस, ग्रॅन्ड वेटिंग हॉल, टॉयलेट, बाथरूम, रिटायरिंग रुम,सामूहिक विश्राम कक्ष, फूड प्लाझा आदी सुविधा देण्याचा रेल्वेचा विचार आहे. रेल्वे स्थानकासमोर उड्डणपूल होणार आहे. त्याचाही लाभ घेण्याचा विचार करण्यात येणार आहे. मालधक्क्याच्या जागी इमारत नवीन इमारत बांधली जाणार आहे.

इमारतीच्या पहिल्या मजल्यावर चारचाकी दुचाकी वाहनतळ करण्याची योजना आहे. त्यामुळे प्रवाशांना वाहने लावून थेट फलाट क्रमांक एकवर प्रवाशांना येता येईल.

नगरविकासकडून २०० कोटी
विकास कामांसाठी नगरविकास मंत्रालयाकडून सोलापूर स्थानकासाठी रेल्वेला सुमारे दोनशे रुपयांचा निधी मिळणार आहे. ही सर्व कामे त्या निधीतून करण्याचा विचार रेल्वे प्रशासनाचा आहे. त्यासाठी सोलापूर प्रशासन कामाला लागले असून अशा प्रकारचा प्रस्ताव तयार करित आहे.
५० वर्षांचा विचार
^सोलापूर रेल्वेस्थानक स्मार्ट बनविताना पुढच्या ५० वर्षाचा विचार करून, गरजांचा अभ्यास करून प्रस्ताव तयार करत आहोत. प्रस्ताव पूर्ण झालेला नाही. यात मुख्य इमारतीत मोठा बदल करणे, उड्डाणपुलाला उतार देत जुन्या मालधक्क्याच्या जागी वाहनतळ उभारणे आदी बाबी समाविष्ट केल्या जाणार आहेत.'' डी.डी. लोलगे, कार्यकारी अभियंता, रेल्वे विभाग, सोलापूर
बातम्या आणखी आहेत...