आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आराखडा लवकरच सादर होणार, सोलापुरातून सुटणाऱ्या गाड्या वाढणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापुरातरेल्वे टर्मिनल्स उभारण्याच्या शक्यतेविषयी रेल्वे मंडळाने विचारणा केली आहे. त्याचा आराखडा सोलापूर विभागाने तयार केला आहे. तो येत्या दोन दिवसांत पाठवण्यात येईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

टर्मिनल्स झाल्याने येथून धावणाऱ्या गाड्यांच्या संख्येत वाढ होऊन सोलापूर आणखी नव्या शहरांशी जोडले जाऊ शकेल. त्यामुळे सोलापूरला टर्मिनल्स होणे हे सोलापूरसाठी खूप मोठी बाब असणार आहे. देशाच्या सुवर्ण चतुष्कोनच्या रेल्वे मार्गावर सोलापूर रेल्वेस्थानक आहे. कर्नाटक आंध्र प्रदेश या दोन राज्यांसह केरळ, तामिळनाडू आदी दक्षिणेच्या प्रमुख राज्यांशी सोलापूर जोडले गेले आहे.

विजापूरनाका परिसरात प्रस्ताव
विजापूरनाका परिसरात रेल्वेची मुबलक जाागा आहे. ही बाब गृहीत धरून रेल्वे प्रशासनाने त्याचा आराखडा तयार केला आहे. टमिनल्स उभारण्यासाठी सुमारे २५ कोटी रुपयांची गरज भासणार आहे. टर्मिनल्समुळे नव्या गाड्या सोलापूरहून सुरू होतील आणि सोलापूरलाच थांबतील. गाड्यांना उभारण्याची खास जागा मिळेल. बाहेरील गाड्यांसाठी फलाट उपलब्ध होऊ शकेल. मध्य रेल्वे विभागात सोलापूरशिवाय अन्यत्र मोठ्या प्रमाणात मोकळी जागा नाही. त्यामुळे सोलापूरला अनुकूल स्थिती आहे.

रेल्वेमंत्रालयास पत्र दिले
^सोलापूरलाटर्मिनल्स व्हावे म्हणून मी रेल्वे मंत्रालयाला पत्र दिले आहे. सोलापूर विभागाने प्रस्ताव दिल्यानंतर मी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठपुरावा करून सोलापूरला टर्मिनल्स उभारण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करेन.” अॅड.शरद बनसोडे, खासदार

प्रस्तावतयार केला आहे
रेल्वेबोर्ड कडून सोलापूरला टर्मिनल्ससाठी विचारणा झाली असून, सोलापूर रेल्वे विभागाने प्रस्ताव तयार केला आहे. तो लवकरच रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे.’’ राजूभडके, वरिष्ठ विभागीय बांधकाम अभियंता