आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाॅप-१० स्मार्टमध्ये सोलापूर सिटी राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर स्मार्ट सिटी - Divya Marathi
सोलापूर स्मार्ट सिटी
सोलापूर - केंद्रसरकारच्या बहुचर्चित स्मार्ट सिटी योजनेत सोलापूरचा समावेश झाला आहे. या योजनेसाठी राज्यातील दहा शहरांची निवड होणार होती. त्यात सोलापूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तशी शिफारस राज्य सरकार केंद्राला करणार आहे. स्मार्ट सिटी योजनेत शहराचा समावेश झाल्याचे कळताच विविध ठिकाणी फटाके उडवून आनंद व्यक्त करण्यात आला. महापालिकेत आनंदोत्सव साजरा करत महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, महापौर सुशिला आबुटे यांचा सत्कार करण्यात आला.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत दरवर्षी केंद्र सरकार १०० कोटी, राज्य सरकार ५० कोटी आणि महापालिका ५० कोटी असे मिळून एकूण २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. यातून नागरी सुविधा सुखकर होतील आणि त्यामुळे २०२० पर्यंत शहर स्मार्ट होईल, अशी योजना आहे.

बुधवारी राज्य शासनाच्या स्मार्ट सिटी निवड समितीसमोर महापालिका आयुक्त काळम-पाटील यांनी मर्यादित वेळेत उत्तम सादरीकरण केले. चार मुद्द्यांवर त्यांनी प्रभावीपणे मत मांडले.
आयुक्त विजयकुमार काळम - पाटील म्हणाले, माझा आत्मविश्वास वाढला

आराखड्यासाठी करणार प्रयत्न
डिसेंबर२०१४ मध्ये केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्यासह केंद्रीय नेत्यांची भेट घेतली. सोलापूर शहराचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्याने शहराचा कायापालट होणार आहे. ५० वर्षांचा विचार करून आराखडा तयार करण्यासाठी प्रयत्न करणार. विजयसिंहमोहिते-पाटील, खासदार, माढा

शहराचा होणार कायापालट
येणाऱ्याकाळात शहराचा कायापालट होणार आहे. स्मार्ट सिटीसाठी हजार कोटी तर उड्डाणपुलासाठी ७२० काेटी मिळणार आहेत. यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयत्न केले. स्मार्ट सिटीसाठी मनपा आयुक्तांनी योग्य सादरीकरण केले ते उत्तम ठरले. विजयकुमारदेशमुख, पालकमंत्री

केंद्रातही मंजूर होईल योजना
राज्यानेस्मार्ट सिटीसाठी साेलापूरची शिफारस केली आहे. यापुढे केंद्रापुढे महापालिका आयुक्तांना पुन्हा सादरीकरण करावे लागणार आहे. त्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्यासमोर मनपा आयुक्तांना नेऊन मत मांडणार अाहोत. राज्याप्रमाणे केंद्रातही सोलापूरची निवड होईल. शहराचे नाव यापूर्वी होते आणि यापुढेही राहणार आहे. अॅड.शरद बनसोडे, खासदार, सोलापूर

सोलापूरचा विकास होईल
स्मार्टसिटीत शहराचा समावेश झाल्याने शहराचा विकास होईल. यासाठी महापालिका आयुक्तांनी प्रयत्न केले. आम्ही मंुबईत जाऊन स्मार्ट सिटी होणे का गरजेचे आहे याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले. माझ्या काळात शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्याने आनंद झाला. सोलापूरकरांसाठीही हा क्षण आनंद देणारा आहे. सुशिलाआबुटे, महापौर

केंद्रातही यशस्वी होऊ
स्मार्टसिटी संबंधीच्या सादरीकरणानंतर शहराची निवड झाली आहे. महापालिकेतील कर्मचारी हे ९.५८ लाख लोकांचे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यामुळे शहराचा कायापालट होईल. या याेजनेत शहराचा समावेश होईल असा आत्मविश्वास होता. तसे झाल्याने माझा आत्मविश्वास वाढला आहे. राज्याप्रमाणे केंद्रातही यशस्वी होईन. विजयकुमारकाळम-पाटील, मनपा आयुक्त
निवड समितीतील सदस्य म्हणाले, बाप रे :शहरात १.१ लाख मिळकतींची कर आकारणी केली नाही. ते महापालिकेने जीआयएस अंतर्गत शोधले आहे. असे महापालिका आयुक्त काळम-पाटील यांनी समितीपुढे सांगताच समिती सदस्यांच्या तोंडून "बाप रे' हे शब्द बाहेर पडले.
सीसीटीव्ही लावून सुरक्षा :शहरातील नागरी सुविधांसाठी नाक्यासह विविध चौकात सीसीटीव्ही लावून नागरी सुरक्षा देण्यावर महापालिकेचा भर राहणार आहे.

या चार मुद्द्यांवर होता आयुक्तांचा भर
-पर्यटन : शहरातपर्यटन विकासासाठी पुरातन वस्तू आहेत. परिसरात धार्मिक स्थळे आहेत. त्यांचा आराखडा तयार आहे.

२-महसूल : महापालिकेनेजीआयएस अंतर्गत सर्व्हे केला असून, १.१० लाख मिळकती सापडल्या आहेत. त्यातून मनपास ६६ कोटी रुपये मिळतील.

३-नागरी सहभाग : स्मार्टसिटीसाठी नागरी सहभाग घेतला असून, ३८ प्रभागात ५८ सभा घेऊन २२०० जणांचा सहभाग घेतला. एक कमिटी स्थापन करण्यात येईल.

४-व्हीजन : शहरातटेक्सटाइल, मेडिकल, शैक्षणिक हब, नागरी सुविधा, २४ तास पाणीपुरवठा, झोपडपट्टी विकास, स्वच्छ शहर, भविष्यातील प्रश्न आदी.
सोलापुर शहराचे फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा....
बातम्या आणखी आहेत...