आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौर ऊर्जेच्या वापराबाबत सोलापूरकर होताहेत स्मार्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - एकीकडे विजेचे वाढते बिल, अधूनधूनच होणारा विजेचा लपंडाव अाणि अाता येणाऱ्या उन्हाळ्यात जाणवणारे लोडशेडिंग याचा विचार करून सोलापूरकरांनी अातापासूनच पर्यायी विजेचा अर्थात सौर ऊर्जेचा वापर करायला सुरुवात केली अाहे. गेल्या दीड, दोन वर्षात हे प्रमाण हळूहळू वाढते अाहे. सौर ऊर्जेवरील वाॅटर हिटरची मागणी सर्वाधिक असली तरी घरगुती उपकरणांसाठीही अाता सौर ऊर्जा वापरली जाऊ लागली अाहे.

चारशे घरांनी केला संपूर्ण वापर
शहरातगेल्या दीड ते दोन वर्षात सुमारे चारशे कुटुंबीयांनी पूर्ण सौर ऊर्जेची यंत्रे बसवून घेतली अाहेत. तसेच गिझरसाठी असे यंत्र बसवून घेणा-यांची संख्या वर्षाला सुमारे आठशे ते हजारच्या घरात अाहे. तेवढी विक्री झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. अपार्टमेंटमध्ये याचा वापर सुरू झाल्यामुळे याला मागणी वाढली आहे. सोलापूरचे तपमानही सौरऊर्जेसाठी अनुकूल असेच अाहे.

वाॅटरहिटर उपकरणाला मागणी
गेल्यादीड ते दोन वर्षांपासून घरातील उपकरणे वापरण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर होत आहे. सोलापूर शहरात याचे उत्पादन होत असून बाहेरील कंपनीचे डिलरही सोलापुरात आहेत. स्वयंपाकाचा गॅस किंवा विजेचा वापर करून पाणी गरम केले जाते. मग याचा खर्चही त्याच प्रमाणात वाढत असतो. ते टाळण्यासाठी सर्वांत स्वस्त पर्याय म्हणून सोलापूरकर सौर ऊर्जा उपकरणांकडे झुकत अाहेत. दररोज १०० लिटर पाणी गरम करण्याची क्षमता असणारा वाॅटर हिटर १३ हजारांपासून उपलब्ध आहे, तो घेण्याकडे कल अधिक अाहे.

हॉस्पिटलच्या जुन्या इमारतीमध्ये (आयपीडी )२००१ मध्ये ऊर्जा निर्मिती संच बसविण्यात आला आहे. त्यानंतर १४ डिसेंबरमध्ये रोजी किलोवॅटचे ऊर्जानिर्मिती संच बसविण्यात आले आहे. त्यावर संपूर्ण इमारतीमधील फॅन, संगणक, वीज पुरविण्यात येत आहे. नवीन इमारतीमधील संच एका तासाला सात युनिट वीज तयार करेल, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. डॉ अजित गांधी, युनिकहॉस्पिटल

शंभर टक्के सौर ऊर्जेचा वापर करणारे घर
अक्कलकोटरोड येथील शिक्षक प्रशांत सुतार यांनी गेल्या अडीच वर्षांपूर्वी सोलार युनिट बसविले. त्यांना त्यावेळी सव्वालाख खर्च आला होता. महावितरणाच्या विजेचे बिल दरमहा त्यांना दोन हजार येत होते. सोलार बसवून त्यांनी वीज पूर्णपणे बंद केली. घरातील सर्व उपकरणे सोलारवर सुरू आहेत. यामुळे वर्षाचे त्यांचे २४ हजार रुपये वीज बिलाची बचत झाली.

अन्य उपकरणेही चालतात सौर ऊर्जेवर
सौर ऊर्जेवरील पॅनेलद्वारे केवळ लाइटचा बल्बच लागतो असे नाही, तर मोबाइल चार्जरही उपलब्ध झाले अाहे. पंखे, ट्यूबही. तसेच, पॅनेलची संख्या वाढवून अाणि बॅटरीची साेय करून संपूर्ण घर सौर ऊर्जेवरच चालविले जात अाहे. अाता टीव्ही ही सौर ऊर्जेवर चालविणे शक्य झाले आहे. आपल्या सगळ्या गरजा सौर ऊर्जेवर भागवणे शक्य झाल्याची उदाहरणे समोर अाली अाहेत.

सोलारविषयी लोकांत हळूहळू होतेय जागृती
घरगुती उपकरण चालविण्यासाठी सोलार तयार करतो. बाहेरील कंपन्यांचे दोन डिलर अाहेत. घरगुती उपकरणासाठी गेल्या दिड ते दोन वर्षात सुमोर दिडशे ते दोनशे सोलारची विक्री केली आहे. लोकांमध्ये अाता हळूहळू जागृती होतेय. अाणखी काही वेळ लागेल. सुरेश बांदल, इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिक