आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता नाही थांबायचे, पुढेच जायचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - स्मार्ट सिटीत सोलापूरचा समावेश झाल्यानंतर शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. महापालिकेत जल्लोष झाला. स्मार्ट सिटीसाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग होता. याला नेतृत्त्व मिळाले महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांचे. त्यांच्याशी साधलेला संवाद.
स्मार्ट सिटी जाहीर हाेताच काय भावना झाली?
उत्तर - निकालकाय लागणार आहे हे मला आधीच माहीत होते. तसे मी वारंवार सांगत आलो आहे. त्यामुळे मला निकालाची चिंता नव्हती. २० मध्ये आपला नंबर कितवा असेल याची उत्सुकता होती. सोलापूरचे नाव जाहीर झाल्याचे नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांनी सांगितले आणि त्यांनी मला मिठी मारली. त्यामुळे मी भावूक हाेत आनंदी झालो.

पहिलाफोन कोणाला केलंत?
उत्तर- मी पहिला फोन सोलापूरचे पालक सचिव आनंद म्हैसकर यांना केला. त्यांनी मला पाच मिनिटे थांबा, मी मुख्यमंत्र्यांशी बोलणे करून देतो असे सांगितले. पण बोलणे झाले नाही. त्यानंतर अनेक फोन मला आले.

या पुढे लोकसहभाग राहील का?
उत्तर - शासनाचीकोणतीच योजना लोकसहभागाशिवाय शक्य नाही. स्मार्ट सिटीत आमचा समावेश लोकसहभागामुळेच झाला. माय गो या संकेतस्थळावरील व्हीजन प्रतिक्रिया महत्त्वाच्या होत्या. योजना पारदर्शकपणे राबवण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. तो यापुढेही राहील. शहर कसे असले पाहिजे हे लोकच सांगत राहतात. त्यामुळे आम्ही केंद्राकडे आराखडा सादर करताना शेवटच्या क्षणापर्यंत काम करत होतो.

पुढे शहराचा विकास कसा कसेल?
उत्तर- माझे विचार नागरिकांना स्वप्न वाटत असले तरी ते सत्यात येत असतात. शहरास जागतिक दर्जाचे शहर तयार करण्याचा मानस आहे. सोलापूर कोठे आहे, असे िदल्लीत विचारत होते. त्यांना माय गो संकेतस्थळ पाहा त्यावर िदसेल असे आम्ही सांगितले. आज शहराची निवड टाॅप टेनमध्ये आहे. शहराचा टप्याटप्याने विकास होईल. त्यासाठी केंद्र, जागतिक दर्जाच्या आर्थिक संस्था मदत करतील. सिद्धेश्वर मंदिराच्या ३४ एकर परिसराचा विकास होईल. शहराकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल. त्यामुळे आर्थिक उलाढाल होईल.

प्राधिकरणाची रचना कशी असेल?
उत्तर - स्मार्टसिटीसाठी एसपीव्ही (प्राधिकरण) राहील. त्यासाठी केंद्राने नियमावली तयार केली आहे. ते नवीन आहे. कोणतीही मोठी योजना करताना प्राधिकरण असतेच. केंद्र सरकारचे धाेरण आहे. शहराच्या विकासाची संकल्पना यातून मांडता येईल.

स्मार्ट सिटीची प्रत्यक्षात सुरुवात कधी होईल?
उत्तर- स्मार्ट सिटी जाहीर झाली पण प्रत्यक्षात सुरुवात कधी होईल, ते आताच सांगता येणार नाही. शुक्रवारी दुपारी केंद्राच्या अधिकाऱ्यांशी व्हीडीओ काॅन्फरन्स आहे. तेथे दिशा स्पष्ट होईल. यावरून असे दिसून येते आता थांबायचे नाही. काम सुरू करायचे.

नागरिकांना काय आवाहन असणार आहे?
उत्तर- नागरिकांनी आम्हाला साथ दिली. यापुढेही साथ द्यावी. स्मार्ट शहर करण्याचा प्रयत्न करू. पाच वर्षांत टप्याटप्याने शहराचा विकास होणारच.

बग्गीतून मिरवणूक : मनपा आयुक्त काळम-पाटील, महापौर आबुटे यांची मनपा आवारात बग्गीतून मिरवणूक काढून नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला. शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्याने मनपा आवारात सुमारे तीन तास जल्लोषाचे वातावरण होते.