आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटी आराखडा तीन टप्प्यांत हाेणार, ३० सप्टेंबरपासून सुरुवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- स्मार्टसिटीचा आराखडा तयार करण्याचे काम तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने ३० नोंव्हेबरपर्यंत कालमर्यादा ठरवून दिली आहे. ३० सप्टेंबरपासून पहिल्या टप्प्यास प्रारंभ होईल. नियोजनानुसार महापालिका काम करत आहे. गणेशोत्सव काळात या योजनेअंतर्गत तयारी सुरू आहे. या योजनेत नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी महापालिकेकडून जनसंवादावर भर देण्यात येत आहे.

महापालिकातयार करणार स्मार्ट सिटी वेबसाइट
स्मार्टसिटीचा विकास आराखडा तयार करण्यास क्रिसील कंपनीला मक्ता निश्चित करण्यात आला आहे. त्यांना अद्याप वर्कआॅर्डर देण्यात आलेली नाही. स्मार्ट सिटीबाबत नागरिकांचे मत घेण्यास महापालिका स्मार्ट सिटी वेबसाइट तयार करणार आहे. त्यात नागरिकांना मत नोंदवता येईल. याबाबत "माय गो' या साइटवर मत नागरिकांना नोंदवता येते.

स्मार्ट सिटीचा प्लॅन सादरकरण्यापूर्वी नागरिकांची मते घेणे, नागरिकांकडून शहर विकासाचे काय प्लॅन असेल याबाबत संवाद साधणे, शासनाचे वेबपोर्ट "माय गो' या पोर्टलवर मत सादर करणे.
शहराचे व्हीजन काय असले पाहिजे, स्मार्ट सिटी मिशनमध्ये काय असले पाहिजे, यासाठी नागरिकांकडून मार्गदर्शन घेणे. शहरातील विविध भागांत काय विकास अपेक्षित आहे, त्याची विभागनिहाय माहिती संकलीत करणे, तसेच त्याचे पर्याय उपलब्ध करणे.
१५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर
३१ आॅक्टोबर ते १४ नोव्हेंबर
३० सप्टेंबर ते ३० आॅक्टोबर

असे असतील टप्पे
मक्तेदारांची आज नियुक्ती : स्मार्टसिटी आराखडा तयार करण्यास क्रिसील कंपनीस मक्ता निश्चित करण्याचा फेरप्रस्ताव मनपा स्थायी समितीसमोर आहे. बुधवारी स्थायी समिती सभा असून त्यात विषय चर्चिला जाणार आहे. त्यानंतर यावर निर्णय अपेक्षित आहे.

मंडळाकडून सूचना मागवणार
स्मार्टसिटीचा आराखडा तयार करण्यास नागरिकांची मदत घेण्यात येणार आहे. त्यासाठी जनजागृती सुरू केली आहे. गणेशोत्सव काळ असल्याने मंडळाच्या कार्यकर्त्याकडून सूचना मागण्यात येणार आहे. त्यासाठी पत्रके आणि बाॅक्स देण्यात येत आहेत.

मनपाचे कामकाज सुरू
आराखडातयार करण्याच्या मक्ताचा विषय प्रलंबित असला तरी मनपाने कामकाज सुरू केले आहे. अमितादगडे-पाटील, स्मार्ट सिटी विभाग प्रमुख
आराखडा तयार करणे, त्यात नागरिकांची मागणी काय आणि शहराची गरज काय आदी माहिती आवश्यक आहे.