आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडीचा असाही प्रवास, पिवळ्या रंगातील रेखांकित क्षेत्र पहिल्या टप्प्यात विकसित होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - केंद्राच्या स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत सहभागी होण्याचे ठरल्यानंतर सर्वप्रथम सोलापूर महापालिकेने विशेष सभेचे अायोजन केले होते. यात शहराचे महत्त्वाचे प्रश्न, समस्या याचे मूल्यमापन करण्यात आले. पालिकेने प्रस्तावात शुद्ध पुरेसे पाणी, खात्रीशीर वीजपुरवठा, स्वच्छता घनकचरा व्यवस्थापन, कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, गरिबांना परवडणारी घरे, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, गव्हर्नन्स, महिला, मुले वृद्ध यांची सुरक्षा आदी बाबींचा प्रामुख्याने समावेश केला. त्यावर स्मार्ट सोल्युशन निर्धारित केले. यानंतर स्मार्ट सिटीच्या संकल्पनेस गती आली.
स्मार्ट सिटीसाठीलोकांचा सहभाग वाढवणे महत्त्वाचे होते. यासाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित करण्यात येऊ लागले. विद्यार्थी युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हीजन स्टेटमेंट बनवण्यात आले. यात प्रत्येक विद्यार्थ्यास कागदी फॉर्म देण्यात आले. सोलापुरातील १०४ वॉर्डात विद्यार्थी पाठवण्यात आले. एका वॉर्डात मुले मुली पाठवून नागरिकांशी संवाद साधला गेला. त्यांच्याकडून फॉर्मवर सूचना अभिप्राय घेण्यात आला. यानंतर नागरी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी तज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली. चर्चेतून सुमारे ५५ स्मार्ट सोल्युशन तयार करण्यात आले.
यानंतर एरिया बेस्ड डेव्हलपमेंटच्या अंतर्गत शहराचे तीन भाग करून प्रथम एका भागाचा विकास करण्याचे ठरले. पालिकेत स्मार्ट सिटी टेक्नोफेअरचे आयोजन करण्यात आले. यात ७५ हजार नागरिकांनी अर्जाद्वारे आपले अभिप्राय नोंदवले. एसएमएसच्या माध्यमातून जवळपास १५ लाख ६१ हजार नागरिकांशी संपर्क साधला गेला. शहरातील ३४ वॉर्डात सभा घेण्यात आल्या. सभेच्या माध्यमातून साधारणपणे १० हजार नागरिकांपर्यंत हा विषय पोहचवण्यात आला.
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदी सार्वजनिक उत्सवातूनही लोकांशी संपर्क साधला गेला. सेवाभावी संस्था, संघटना, शाळा महाविद्यालय, चेंबर ऑफ कॉमर्स आदींसोबत मोठ्या स्वरूपात ३४ नागरी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच्या माध्यमातून लाख लोकांशी संपर्क केला. यानंतर स्मार्ट सिटीविषयी नागरिकांनी ऑनलाइन अभिप्राय नोंदवावा म्हणून आवाहन करण्यात आले. केंद्र सरकारच्या माय गो या वेबसाइटवर ३० ऑक्टोबरपर्यंत मत नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले. यात हजार ५०० विक्रमी प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या. यासाठी इंजिनिअरिंगच्या २२०० विद्यार्थ्यांची मोठी मदत झाली. या शिवाय फेसबुक ट्विटर माध्यमातून महापालिकेस हजार प्रतिक्रिया मिळाल्या. शिवाय मते जाणून घेण्यासाठी आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेसही चांगला प्रतिसाद लाभला. सुमारे २३७२ जणांनी निबंध स्पर्धेत भाग सहभाग नोंदवला. एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेल्या सूचनांचे मतांचा विचार करून क्रिसील कंपनीच्या माध्यमातून पालिकेने स्मार्ट सिटीचा प्रस्ताव तयार केला.
निवडीचा असाही प्रवास
पिवळ्या रंगातील रेखांकित क्षेत्र पहिल्या टप्प्यात विकसित होणार
- २९ जानेवारी दुपारी १२ वाजता -२० शहरांच्या महापालिका आयुक्तांसोबत केंद्राचे नगरविकास सचिवाकडे व्हीडीओ काॅन्फरन्स होणार आहे.
- फेब्रुवारी-नवी दिल्ली येथे केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत मनपा आयुक्तांची दोन दिवस कार्यशाळा
- फेब्रुवारी-नवी दिल्ली येथे राऊंड टेबल कार्यशाळा
- १०११ फेब्रुवारी -राज्य शासनाच्या वतीने थर्ड स्मार्ट सिटी समिट
- मनपात स्मार्टसिटी ठराव - १४ जून २०१५
- स्थायीसमितीठराव - १७ जून २०१५
- क्रिसीलकंपनीसवर्क आॅर्डर - आॅक्टोबर २०१५
- मनपाठरावआराखड्यास मंजुरी - ३१ आॅक्टोबर २०१५
- क्रिसीलकंपनीनेतयार केलेला आराखडा - डिसेंबर २०१५
- राज्याचेमुख्यसचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक - ११ डिसेंबर २०१५
- नगरविकास नवी दिल्लीकडे पाठवले पत्र - १४ डिसंेबर २०१५
- राज्याचेनगरविकास खात्याकडे पत्र - १५ डिसेंबर २०१५
- अव्वर सचिव शहर विकास मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर - १५ डिसेंंबर २०१५
- केंद्राकडून २० शहरांची यादी जाहीर - २८ जानेवारी २०१६