आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कालावधीत कामे न केल्यास स्मार्ट सिटीतून बाहेर जाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - स्मार्टसिटी योजनेत शहराचा समावेश झाला असला तरी केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या कार्यकाळानुसार काम करणे आवश्यक आहे. वेळेत काम पूर्ण झाल्यास शहर योजनेतून बाहेर पडेल, असे केंद्रांकडून जारी करण्यात आलेल्या नियमावलीत म्हटले आहे.
केंद्राच्या स्मार्ट सिटी मिशन विभागाच्या वतीने ९७ शहरांची यादी आणि त्यांचे गुणांकन जाहीर करण्यात आले. पहिल्या टप्यात देशातील २० शहरांचा समावेश आहे. सोलापूर ६०.८३ गुणांसह व्या स्थानी आहे. स्मार्ट सिटी मिशन विभागाकडून मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. पहिल्या यादीत समोवश सोलापूरचा असल्याने पहिल्या टप्प्यातील निधी मिळणार आहे. २०१५-१६ च्या केंद्राच्या अंदाजपत्रकात निधीची तरतूद केली.

नगरविकास सचिवांनी केले अभिनंदन
पहिल्या टप्प्यातील २० शहरांतील मनपा आयुक्तांशी केंद्राचे नगर विकास खात्याच्या सचिवानी संवाद साधत अभिनंदन केल्याची माहिती मनपा आयुक्त काळम-पाटील यांनी दिली.

विविध कंपन्यांकडून होतेय विचारपूस
स्मार्ट सिटीत समावेश झाल्याने अनेक कंपन्यांकडून शहराबाबत विचारपूस करण्यात येत आहे असे आयुक्त काळम-पाटील यांनी स्थायी सभागृहात सत्कार प्रसंगी सांगितले.