आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरची "स्मार्ट' वाटचाल; मनपाचे झाले ९७.५ गुण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - केंद्राच्यास्मार्ट सिटी योजनेत सहभागासाठी सोलापूर महापालिकेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. सोमवारी करण्यात आलेल्या योजनेतील फाइल तपासणीत प्रभाग बैठकीचे अडीच गुण वाढले असून आता एकूण गुणांची संख्या १०० पैकी ९७.५ झाली आहे. या आठवड्यात मनपाला योजनेसाठी प्रेझेंटेशन करण्याची संधी मिळण्याची शक्यता असून तयारी सुरू आहे. दरम्यान, स्मार्ट सिटी योजनेत सोलापूरचा नक्की सहभाग होईल,असा विश्वास आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी व्यक्त केला आहे.

स्मार्ट सिटीत शहराचा समावेश व्हावा याकरिता मागील आठ दिवसांपासून महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार प्रभागनिहाय बैठका घेण्यात येत आहेत. तसेच प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण करण्यात आली आहे. त्यानंतर सहाय्यक आयुक्त अमिता दगडे-पाटील मुंबई बैठकीसाठी गेल्या होत्या. त्यांनी मनपाची फाइल शासनाकडे सादर केली. त्या फाइलची तपासणी सोमवारी झाली. त्यात मनपाच्या गुणात वाढ दिसून आली.
२.५ गुण नगरोत्थान योजनेच्या कामाबाबत मिळवता आले नाहीत.
९७.५ गुण प्रभागात बैठका घेऊन नागरिकांच्या सूचना जाणून घेणे, तसेच यूआरडीएसएसएमटी योजनेच्या अडीच गुणांची भर पडल्याने एकूण झाल्याचे सांगण्यात आले.
९५ गुण (१०० पैकी) स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मागील आठवड्यात झालेल्या तपासणीत मनपाला मिळाले होते. त्यानंतर अन्य पाच गुण वाढीसाठी प्रयत्न करण्यात आले.

स्मार्ट सिटीत शहराचा नक्कीच समावेश
स्मार्टसिटी योजनेत शहराचा समावेश होईल, असा विश्वास आहे. फाइलची छाननी झाली. आता त्याचे प्रेझेंटेशन राज्य शासनाकडे करण्यात येईल. मागील आठ दिवसांपासून केलेल्या प्रयत्नांबाबत समाधान वाटते. विजयकुमारकाळम-पाटील, आयुक्त
झोननिहाय बैठक (कसांससंख्या) :झोनक्र. (१७), झोन क्र. (१), झोन क्र. (४), झोन क्र.४ (५). झोन क्र. (६) , झोन क्र. (१०), झोन क्र. (१२), झोन क्र. (८)

५१ प्रभागांत ६३ बैठका
स्मार्टसिटीबाबत नागरिकांकडून सूचना मागवण्यासाठी ५१ प्रभागांमध्ये बैठका घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. झोन क्रमांक एक मध्ये सर्वाधिक १७ बैठका झाल्या तर झोन क्रमांक मध्ये फक्त एक बैठक झाली. ५१ प्रभागात ६३ बैठका झाल्या.
बातम्या आणखी आहेत...