आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्राद्धाचा सर्व खर्च टाळून निराधार वृद्ध घेतले दत्तक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर- सोलापूरच्या पूर्व भागातल्या एका उच्चशिक्षित सुनेने सासू-सासऱ्यांच्या निधनानंतर निराधार आजी-आजोबांना दत्तक घेऊन त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली. आपल्या सासू-सासऱ्यांच्या रुपातच त्यांना पाहण्याचे ठरवले.
बी.एस्सी. डी.सी.एम. शिकलेल्या ममता श्रीनिवास बोलाबत्तीन यांच्या सासू कमलाबाई हणमंतू बोलाबत्तीन (७६) यांचे गेल्या महिन्यात २० ऑगस्टला निधन झाले. त्यानंतर नऊ दिवसांनी सासरे हणमंतू राजण्णा बोलाबत्तीन (८३) यांनीही जगाचा निरोप घेतला. घरातील ज्येष्ठ मंडळी अचानक नाहीशी झाल्याने शोककळा पसरली. महिन्यात दोनदा नऊ दिवसांच्या अंतराने मासिक श्राद्ध घालण्याऐवजी निराधार आजी-आजोबांना दत्तक घेतले तर... असा प्रस्ताव ममतांनी मांडला. घरच्यांनीही तो मान्य केला. रोटरीच्या अन्नपूर्णा
योजनेतून ही सेवा करण्याचे निश्चित झाले. आजी-आजोबांसाठी पैसे सुपूर्द केले. या माध्यमातून त्यांनी सर्वांना सामाजिक भानही दिले.
बातम्या आणखी आहेत...