आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुटीवरून रुजू झालेल्या कळमणच्या जवानाचा मृत्यू, बिहार सीमेवर आला हृदयविकाराचा झटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर सोलापूर - कळमण (ता. उत्तर सोलापूर) येथील केंद्रीय राखीव दलातील सैनिक संतोष शहाजी लंबे (वय ४५) यांचे बिहार येथे सेवा बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. रविवारी त्यांचे पार्थिव कळमण येथे आणण्यात येईल.
 
संतोष लंबे हे गेल्या एकवीस वर्षांपासून केंद्रीय राखीव दलात कार्यरत होते. सध्या ते बिहार झारखंड सीमेवर नेमणुकीस होते. शुक्रवारी सकाळी कामावर असताना त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना नजीकच्या इस्पितळात दाखल केले. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. याबाबत त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कळमण येथील नातेवाईकांना फोनवरून घटनेची माहिती दिली. लंबे हे गेल्याच आठवड्यात पंधरा दिवस रजेवर गावीच होते. सोमवारी (दि.२८) कामावर हजर झाले होते. कुटुंबांपासून गेल्या नंतर अवघ्या चारच दिवसांत त्यांचा मृत्यू झाला. 
 
बातम्या आणखी आहेत...