आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर बंदला हिंसक वळण; आंदोलकांनी रिक्षा पेटवली, यशवंत सेनेचे बंद हाणून पाडण्याचे आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- विद्यापीठाला सिद्धेश्वरांचे नाव देण्यासाठी शिवा संघटनेने सोमवारी सोलापूर बंदची हाक दिली आहे. यावेळी हिंसक झालेल्या आंदोलकांनी रामलाल चौकात रिक्षा जाळण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी कुणालाही विश्वासात न घेता सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव जाहीर केले. त्याचा निषेध करण्यासाठी सोलापूर बंदीची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, यशवंत सेनेने सोलापूरकरांना हा बंद हाणून पाडण्याचे आवाहन केले आहे. 
 
सोलापूर विद्यापीठाला ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांचे नाव डावलून अहिल्यादेवी होळकरांचे नाव दिल्याने संतप्त झालेल्या वीरशैव लिंगायत समाजाने आज ‘सोलापूर बंद’ची हाक दिली असतानाच धनगर समाजाने याच दिवशी ‘आनंदोत्सव’ साजरा करण्याचे ठरविले आहे. विद्यापीठ नामांतराचा खेळखंडोबा होत असल्याने चिंतेचा विषय ठरला आहे.
 

सोलापूर विद्यापीठाला कोणाचे नाव द्यायचे, यासाठी ग्रामदैवत सिद्धेश्वर, अहिल्यादेवी होळकर यांच्यासह वेगवेगळ्या तब्बल 28 नावांचे प्रस्ताव आले असताना यात सिद्धेश्वर व अहिल्यादेवी होळकरांच्या नावासाठी अनुक्रमे लिंगायत व धनगर समाजाने स्वतंत्र आंदोलने केली होती. हा प्रश्न चिघळला असतानाच अचानकपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यादेवी होळकरांचे नाव विद्यापीठाला देण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयामुळे वीरशैव लिंगायत समाजात संतापाची भावना उसळली असून यात याच समाजाचे असलेले पालकमंत्री विजय देशमुख व दक्षिण सोलापुरातून प्रतिनिधित्व करणारे सहकारमंत्री सुभाष देशमुख हे दोघेही मंत्री अडचणीत सापडले आहेत.

 

शासनाच्या निर्णयाच्या विरोधात वीरशैव लिंगायत समाजाने शिवा वीरशैव युवक संघटनेच्या झेंडय़ाखाली ‘सोलापूर बंद’ पुकारला आहे. या बंदला लिंगायत समाजाचा प्रभाव असलेल्या भागातून प्रतिसाद मिळत आहे. यात सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीसह शहरातील कसबा, बाळीवेस, मीठ गल्ली, भुसार गल्ली, जोडभावी पेठ, मंगळवार पेठ, सराफ कट्टा, मधला मारूती आदी भागात ‘बंद’ला विशेषत्वाने प्रतिसाद मिळत आहे.

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

 
 
बातम्या आणखी आहेत...