आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरचा पारा ४४ अंश सेल्सिअसवर; हंगामात उच्चांकी तापमान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहर आणि परिसरात उन्हाचा कडाका आणखी वाढू लागला आहे. शहरात बुधवारी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हंगामातील हा उच्चांक आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापुरात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.
गेल्या आठ दिवसांपासून शहरातील तापमान वाढत आहे. चार दिवसांपूर्वी शहरात ४३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. उन्हाचा कडाका कमी होण्याऐवजी वाढत आहे. उन्हाच्या कडाक्याने रस्त्यावरील वर्दळ तर कमी होऊ लागली आहे. लोक बाहेर पडण्याऐवजी घरात बसण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र उन्हाच्या कडाक्याने घरातील भिंतीही तापू लागल्या आहेत. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाच्या झळा दिवसा आणि रात्रीही त्रास देत आहेत.
मध्य महाराष्ट्रात पुणे, लोहगाव, अहमदनगर, जळगाव, कोल्हापूर, महाबळेश्वर, मालेगाव, सांगली, सातारा, नाशिक यांचा समावेश होतो. मालेगावमध्ये ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.