आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे प्रवासी, गाड्या वाढल्या, आता प्रतीक्षा रेल्वे टर्मिनल्सची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरकर सोलापूर ते हैदराबाद दरम्यान धावणारी इंटरसिटी सुरू करावी अशी मागणी करत आहेत. मात्र रेल्वे प्रशासन सोलापूर ते हैदराबाद ही गाडी सुरू करता गुलबर्गा ते हैदराबाद इंटरसिटी सुरू करित आहे. यापूर्वी गुलबर्गा -हैदराबाद इंटरसिटी सुरू करण्यात आली होती. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद लाभल्याने १५ ते २० दिवसांतच गाडी बंद झाली. गुलबर्गा एेवजी सोलापूरहून सेवा सुरू झाल्यास सोलापूरकरांच्या दृष्ठीने सोयीचे तर ठरेलच शिवाय रेल्वेलाही चांगले उत्पन्न प्राप्त होईल.
येत्या सोमवारी गुलबर्गा -हैदराबाद इंटरसिटी सुरू होत आहे. गाडी क्रमांक ११३०७ ही दररोज गुलबर्गा स्थानकावरून सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी निघेल. हैदराबादला दुपारी दोन वाजून ५० मिनिटांनी पोहचेल. तर गाडी क्रमांक ११३०८ हैदराबाद रेल्वे स्थानकावरून दुपारी वाजता निघेल आणि गुलबर्ग्याला रात्री वाजता पोहचेल. गाडीस १३ डबे जोडण्यात आलेले आहे. यात एक वातानुकूलित डबा, १० सेकंड सिटींग, सर्व साधारण आदी डब्यांचा समावेश आहे. सोमवारी सिकंदराबाद येथून रेल्वे मंत्री व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गाडीस हिरवा झेंडा दाखवून उद््घाटन करतील. यावेळी माजी रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांची उपस्थिती असणार आहे.
सोलापूर - सोलापूर शहराचे विस्तारीकरण वेगाने होत आहे. तसेच रेल्वे गाड्यांची संख्याही वाढत आहे. प्रवाशांची रेल्वे गाड्यांची वाढती संख्या लक्षात घेता सोलापूरला रेल्वे टर्मिनल्सची बांधण्याची गरज निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन सोलापूर रेल्वे विभागाने दुसऱ्यांदा जुळे सोलापूर येथे टर्मिनल्स उभारण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडे पाठविला. लवकरच हा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून रेल्वे बोर्डला सादर केला जाईल. सोलापूर स्थानकाजवळ उपलब्ध असलेली पुरेशी जागा लक्षात घेता सोलापूरला टर्मिनल्स मंजूर होऊ शकते. मात्र यासाठी लोकप्रतिनिधींनी आपले वजन खर्ची पाडणे गरजेचे आहे.

सोलापूर रेल्वे विभागाने जुळे सोलापूर टर्मिनल्ससाठीचा आराखडा तयार केला आहे. टर्मिनल्ससाठी कंबर तलाव आणि आसरा ब्रीज जवळचा परिसर असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. सोलापूर ते होटगी दरम्यान रेल्वे प्रशासनाकडे जवळपास १९२ हेक्टरची जागा उपलब्ध आहे. टर्मिनल्ससाठी केवळ १५ हेक्टर जागेची गरज भासणार आहे. यासाठी सुमारे ३० कोटी रुपयांची गरज भासणार आहे.

कसेअसेल टर्मिनल्स
टर्मिनल्स उभारताना भविष्यात वाढणाऱ्या रेल्वे गाड्यांचा विचार प्रामुख्याने केला जाईल. यासाठी येथे लुप लाइन, होल्डींग लाइन, दोन फलाट, रेल्वे आरक्षण केंद्र, चालू तिकीट खिडकी, प्रवाशांसाठी वेटिंग हॉल आदी प्रवासीभिमुख सुविधा देण्यात येतील.
Ãसोलापूर -पुणेइंटरसिटीच्या धर्तीवर सोलापूर -हैदराबाद ही गाडी सुरू करावी, अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची सोलापूरकरांची मागणी आहे. या रास्त मागणीकडे रेल्वे प्रशासन कानाडोळा करून गुलबर्गा स्थानकावरून गाडी सुुरू करित आहे. ही गाडी सोलापूरहून सोडावी अशी मागणी सरव्यवस्थापकांकडे करणार आहे. बाबूरावघुगे, सदस्य, सल्लागार समिती

Ãसोलापूरला टर्मिनल्सव्हावे यासाठी यापूर्वीच प्रयत्न केले आहे. आता रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी सोलापूरच्या प्रश्नाविषयी चर्चा केली जाईल. अॅड.शरद बनसोडे, खासदार

प्रस्ताव पाठविला आहे
Ãजुळे सोलापूर लाटर्मिनल्स उभारावे असा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडे दिला आहे. ताे मंजूर होऊन तो अंतिम मंजुरीसाठी रेल्वे बोर्ड कडे पाठविला जाईल. सोलापूरच्या दृष्टीने टर्मिनल्स होणे गरजेचे आहे. मनिंदरसिंग उप्पल, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक.
बातम्या आणखी आहेत...