आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: शहरात दोनशे जणांना डेंग्यूची लागण, सहाशेंची तपासणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो. - Divya Marathi
फाईल फोटो.
सोलापूर - शहर आणि जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळत असल्याने पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सोमवारी शासकीय विश्रामगृह येथे आढावा घेतला. ग्रामीणपेक्षा शहरात जास्त संशयित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे सुमारे सव्वादोन लाख मिळकतींचा सर्व्हे करून तपासणी करण्याचे आदेश पालकमंत्री देशमुख यांनी महापालिका आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी दिले. 
 
जानेवारी ते आॅक्टोबरदरम्यान ग्रामीण भागातून २६८ रुग्णांचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी ६८ जणांचे नुमने पाॅझिटिव्ह निघाले. तसेच निमशहरी भागात ४० नमुने घेतले, त्यापैकी १५ नमुने पाॅझिटिव्ह आणि सोलापूर शहरात ५९२ जणांचे नमुने घेतले त्यापैकी २०१ नुमने पाॅझिटिव्ह आढळले. 

गप्पी मासे सोडा, फवारणी धुरावणी करा : शहरातअनेक ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळतात. डबक्यात ठिकाणी गप्पी मासे साेडणे आवश्यक आहे. सुमारे १५० ठिकाणेे आहेत. तेथे गप्पी मासे साेडण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याने रोजंदारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करून गप्पी मासे सोडा, असा आदेश बैठकीत महापालिका आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी मलेरिया विभागाचे कुंभार यांना दिला. 
 
डेंग्यू, स्वाइनफ्लूसारख्या आजारास प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहावे. प्रत्येक घराची तपासणी करण्यात येणार आहे. दाट लोकवस्तीच्या भागात फवारणी करण्याचा आदेश दिला. 
- विजयकुमार देशमुख, पालकमंत्री 
 
प्लेट लेट्सचा दर समान असावा 
रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेट्स पुरवण्याचे दर समान असावेत, असे मत पालकमंत्री देशमुख यांनी व्यक्त केले. नागरिकांनी खासगीबरोबर शासकीय रक्तपेढीत रक्तदान करावे, असे सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता डाॅ. सुनील घाटे यांनी सांगितले. महापालिका २०० रक्तदात्यांची यादी तयार करेल आणि गरजेनुसार त्यांच्याकडून रक्तदान करून घेता येईल, असे आयुक्त डाॅ. ढाकणे म्हणाले. उपमहापौर शशिकला बत्तुल, स्थायी समिती सभापती संजय कोळी, सभागृह नेता सुरेश पाटील, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत म्याकलवार आदी उपस्थित होते. 
 
शहरात डेंग्यूने एकही मृत्यू नाही 
शहरात एकाही रुग्णाचा डेंग्यूने मृत्यू झाला नाही, अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. दवाखान्यातून सांगण्यात आले तरी त्याबाबतच अहवाल दवाखान्याकडून मनपास प्राप्त झाला नाही. याबाबत माहिती बैठकीत सांगितल्यावर मनपा सभागृह नेते सुरेश पाटील, स्थायी समिती सभापती संजय कोळी यांनी आश्चर्य व्यक्त केले. 
 
शहरातील घरांचा सर्व्हे होणार 
डेंग्यूची तपासणी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. प्रत्येक घरापर्यंत पोहोचून सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यासाठी मनपा फवारणी विभागाकडे ६२ कर्मचारी आहेत. त्यांना अतिरिक्त कर्मचारी, आशासेविका यांच्या मदतीने सव्वादोन लाख घरांचा सर्व्हे करण्यात येणार आहे. याबाबत आदेश पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिला. 
बातम्या आणखी आहेत...