आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरच्या दोन युवकांचे एरिअल सिनेमॅटोग्राफीत पदार्पण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ड्रोनद्वारे चित्रपटासाठी शूटिंग करण्याचे नवा ट्रेंड सुरू झाला आहे. यात सोलापुरातील लायटनिंग ड्रोन्स इंडियाचे दोन युवक रमजान पठाण इम्रान पठाण यांचे नाव आता अग्रक्रमाने घेतले जात आहे. चित्रपट, विविध जाहिरात इतकेच नव्हे तर चक्क हॉलीवूडमधील चित्रपटासाठीही पठाण यांनी ड्रोनद्वारे चित्रीकरण करून चित्रीकरणाच्या हटके क्षेत्रात आपले नाव ठसवत आहेत. 
 
एरिअल फोटोग्राफी,व्हिडिओग्राफी आणि एरिअल सिनेमाटोग्राफी हे सारखे वाटत असले तरी यांचे अगदी वेगवेगळे तंत्र आहे. ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्याचे आव्हान आहे. चित्रीकरणातील आपले कसब पणाला लावत ड्रोनद्वारे एरिअल चित्रीकरण करणे खरेच एक आव्हानच आहे. पण एक आहे, पुढील पाच वर्षांत फिल्म इंडिस्ट्रीजमध्ये एरिअल फोटोग्राफीचा डायरेक्टर हे पद नक्कीच असेल.” कॅ.इम्रान पठाण, सहसंस्थापक, लायटनिंग ड्रोन्स 
 
बॉलीवूड हॉलीवूडमध्येड्रोन इंडस्ट्री झपाट्याने विस्तारत आहे. २०२५ मध्ये १०० बिलियन डॉलर्स च्या उलाढालीपर्यंत ही विस्तारेल असा अंदाज आहे. या उद्योगाच्या माध्यमातून असंख्य रोजगाराच्या संधी उपलब्ध असतील. यापूर्वी हेलिकॉफ्टरद्वारे चित्रीकरण करावे लागायचे. ही प्रक्रिया खूपच खर्चिक आणि अगदी उंचावरील दृश्यासाठीच योग्य ठरायची. ड्रोनने काम सोपे केले आहे.” रमजानपठाण, एमडी, लायटनिंग ड्रोन्स 
 
यात एरिअल चित्रीकरण 
हिंदी चित्रपट : शबाना, 
विरप्पन. मराठी : निष्कर्ष, अंडे के फंडे. कॅनडा : इनक्युरर्स, फ्रेंच शॉर्ट मुव्ही आदी. तसेच काही जाहिरातीमध्ये याचा वापर करून चित्रीकरण केले आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...