आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर विद्यापीठाने पहिल्याच प्रयत्नात मिळवले नॅकचे "बी' गुणांकन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठाने विविध समस्यांवर मात करीत आपली गुणवत्ता राखली. केवळ दहा वर्षांतच नॅशनल अॅसेसमेंट अॅक्रिडेशन कौन्सिलच्या (नॅक) मूल्यांकनासाठी विद्यापीठ सामारे गेले. नॅकने पहिल्याच तपासणीत दर्जा बहाल केला आहे. गुणवत्ता सिद्ध करणारा हा दर्जा आहे. त्याचे निश्चित स्वागत केले पाहिजे. गुणवत्ता राखत सकारात्मक कार्य होत असल्याचे अधोरेखित झाले. अर्थात ज्यात आपण कमी पडलो ते त्याचे अवलोकन होईल, कमतरता आहे, ती गुणवत्ता सुधारण्यासाठी आगामी काळात भर दिला जाईल, अशी प्रतिक्रिया साेलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.एन. मालदार यांनी "दिव्य मराठी'ला दिली.

सोलापूर विद्यापीठाला नॅकचा दर्जा दिला गेला. याची घोषणा नॅकच्या संकेतस्थळावर झाली. याचे वृत्त समजल्यानंतर विद्यापीठात आनंदाचे वातावरण होते. कुलगुरू डॉ. मालदार कुलसचिव माळी यांनी सर्वांचे अभिनंदन केले.सोलापूर विद्यापीठाचे नॅक (नॅशनल अॅसेसमेंट अॅण्ड अॅक्रिडेशन कौन्सिल) च्या सात सदस्यीय समितीने ते ११ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष मूल्यांकन केले. प्रा. एस. ए. बारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. ओखिलकुमार मेधी, के. बी. बुधोरी, प्रा. ओ. पी. सिंग, प्रा. एस. एम. के. कादरी, डॉ. निरंजना वनल्ली सहायक डॉ. गणेश हेगडे यांची समिती होती.

सर्वांच्या सहकार्याने यश
^विद्यापीठातील सर्वच प्राध्यापक, कर्मचारी, सर्व विभाग यांच्या आपापल्या कार्यातील गुणवत्तेची तपासणी यानिमित्ताने झाली. सर्वांचे सहकार्य, गुणवत्तेची कास यातूनच हे साध्य करता आले.'' शिवशरण माळी, कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ

प्रगती लक्षात येते
^नॅक मूल्यांकनाने गुणवत्तेत आपले विद्यापीठ कुठे आहे, यावर शिक्कामोर्तब होत असते.स्थापनेपासून अवघ्या काही वर्षांत नॅक मूल्यांकन मिळणे हे यशच मानावे. विद्यापीठाने हे सिद्ध केले.'' डॉ.इरेश स्वामी, माजी कुलगुरू, साेलापूर विद्यापीठ

नॅक कशासाठी ?
नॅक मूल्यांकन झाल्यास उच्च तंत्रशिक्षण विभागाकडे कारवाईचा अधिकार आहे. तसेच अनुदान बंद होण्यापर्यंतची कारवाई होत असते. या पार्श्वभूमीवर नॅक मूल्यांकनाला सामोरे जात विद्यापीठ परीक्षेचा हा टप्पा यशस्वी पूर्ण केला. आगामी पाच वर्षानंतर पुन्हा एकदा नॅक समितीच्या गुणवत्तापूर्ण परीक्षेच्या पायऱ्या सर कराव्या लागणार आहेत. विद्यापीठांतील पायाभूत सुविधा, शैक्षणिक कार्य, उपक्रम यांची तपासणी नॅक करीत असते.

नॅकच्या समितीने गुड म्हटले...
याचे वृत्त दिव्य मराठीने १३ सप्टेंबर रोजीच दिले होते. नॅक मूल्यांकनासाठी आलेल्या पीअर टीमने विद्यापीठाच्या प्रगतीला "गुड' म्हटले होते. आपले व्हीजन साकारण्यासाठी गत एक वर्षापासून झटत असलेल्या विद्यापीठाने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर इतर विद्यापीठांसमोरही आदर्शवत असे कार्य ठेवले होते. याचीच या निमित्ताने एक पावती मिळाली.

नॅकची मूल्यंकन पद्धत
पॉईंटग्रेड परफार्मन्स
३.०१ते ४.०० दर्जा व्हेरी गुड , अॅक्रिडेटेड
२.०१ ते ३.०० दर्जा गुड , अॅक्रिडेटेड
१.५१ ते २.०० दर्जा सॅटिसफॅक्टरी, अॅक्रिडेटेड
१.५० च्या खाली दर्जा अनसॅटिफॅक्टरी, नॉन अॅक्रिडेटेड

पुढील काळात विद्यापीठाचा दर्जा आणखी उंचावेल
नॅकमूल्यांकन करणे आवश्यक होते. त्याच बरोबर मूल्यांकनाबाबत आपला दर्जा कोणता हेही तपासणे आवश्यक होते. २.६२ म्हणजे बी प्लस दर्जा मिळाला. पुढील काळात हा दर्जा आणखी उंचावेल अशी अपेक्षाही यानिमित्त असणार आहे.'' डॉ.एन.एन. मालदार, कुलगुरू, साेलापूर विद्यापीठ