आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाचे १४८.८८ कोटींचे बजेट सादर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठाच्या सिनेटमध्ये शनिवारी १४८ कोटी ८८ लाख ३७ हजार १०० रुपये खर्चाचे बजेट वित्त लेखा विभागातर्फे प्राचार्य आर. वाय. पाटील यांनी सादर केले. १३७ कोटी ४७ लाख हजार १०० रुपये अंदाजित जमा गृहीत धरली असून ११ कोटी ४१ लाख ३१ हजार रुपयांची तूट दर्शविणारे अंदाजपत्रक असले तरी तुटीचा मेळ शिल्लक विद्यापीठ विकास निधीच्या १६ कोटी रुपयांमधून साधण्यात येईल.
अंदाजपत्रक तयार करण्यासाठी प्रा. डॉ. ए. ए. शेख यांच्या अध्यक्षतेखाली प्राचार्य आर. वाय. पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी एस.ए. नारकर, प्रभारी वित्त लेखा अधिकारी बी.पी. पाटील यांची अर्थसंकल्प उपसमिती स्थापन केली होती. या समितीने अंदाजपत्रक सादर केले. विधानसभा सदस्य आमदार गणपतराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलगुरू डॉ. एन.एन. मालदार अध्यक्षस्थानी होते. यावेळी कुलसचिव शिवशरण माळी, परीक्षा नियंत्रक बी.पी. पाटील, प्राचार्य आर. वाय. पाटील, एस. ए. नारकर, शिक्षण सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे, विद्यार्थी कल्याण मंडळ संचालक डॉ. हनुमंत मते यांची प्रमुख उपस्थिती होती.
पदवीअभ्यासक्रमातच स्पर्धा परीक्षेची तयारी : कोणत्याहीविषयात बी.ए. केल्यानंतर पुन्हा स्पर्धा परीक्षांची वेगळी तयारी करावयाची असे सध्या विद्यार्थी वर्गात प्रचलित करिअरची दिशा असते. मात्र बी.ए. किंवा एम. ए. ही पदवी स्पर्धा परीक्षा हा विषय घेऊनच केली तर यूपीएसएसी एमपीएससी किंवा विविध स्पर्धा परीक्षांची तयारी पदवी शिक्षण घेतानाच होऊ शकते. असा व्यापक विचार विद्यापीठ करीत आहे. बारावीनंतर थेट बी.ए. हा तीन वर्षांचा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावयाचा. यातून विद्यापीठाची बी.ए. पदवी मिळेल. पुढे याच विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमही पूर्ण करता येईल, अशी चर्चा करण्यात आली.

अशी आहे तरतूद
Áआंतरविद्यापीठअश्वमेध स्पर्धेसाठी ७० लाख
Áज्ञानतीर्थ नगर येथे संरक्षण भिंत उभारणीसाठी कोटी
Áरूसा रिसर्च इनोव्हेटिव्ह हबअंतर्गत प्रस्तावित अनुदान अंदाजे ३० कोटी
Áसंगणकीकरणासाठी २.२५ कोटी
Áस्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी एक लाख हजार तरतुद
Á४० गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकांची भेटसाठी लाख तरतूद
Áक्रीडा, सांस्कृृतिक प्रोत्साहन पारितोषिक लाख ८८ हजार
Áआयएसओ मानांकन घेण्यासाठी लाख रुपयांची तरतूद
Áचर्चासत्रासाठी उपस्थित राहण्यासाठी लाख रुपये
Áकल्याणकारी योजनेसाठी लाख ६० हजार रुपये
Áसंशोधनाला चालना मिळण्यासाठी दोन कोटी
Áकर्मचारी आरोग्य विमा कॅशलेस साठी २० लाख
Áकमवा शिका योजनेसाठी पाच लाख
Áअपंग विद्यार्थ्यांना सोयी साठी ५८ लाख
Áवृक्ष पर्यावरण संवर्धनासाठी ४२ लाख
Áदत्तक गावांतील सुविधेसाठी १० लाख

अर्थसंकल्प वैशिष्ट्ये
विद्यपीठाचा हा अर्थसंकल्प विद्यार्थी, विद्यापीठाचा शैक्षणिक भौतिक विकास, आधुनिक उपकरणे खरेदी, नवीन इमारत ग्रंथालय विकास या दिशेने विद्यापीठाचा व्यापक दृष्टिकोनातून तयार करण्यात आला आहे.

पाठपुरावा करणार
^विद्यापीठएकजिल्ह्यापुरते असल्याने शासन पातळीवर थोडी दुर्लक्षाची झालर आहे. मात्र विद्यापीठाची प्रगती साधण्यासाठी आवश्यक त्या प्रयत्नासाठी तयार आहे. निधी प्रस्ताव मंजुरीसाठी पाठपुरावाही करण्यात येईल. गणपतराव देशमुख, आमदार
बातम्या आणखी आहेत...