आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाने बनवले तीन अॅप्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी सोलापूर विद्यापीठ परीक्षा विभागाने सोलापूर युनिर्व्हसिटी हे मोबाइल अॅप विकसित केले. या अॅपद्वारे विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर प्रवेशविषयक माहिती, विविध प्रकारचे ऑनलाइन फार्म, परीक्षेचे निकाल, विविध सूचना आदी सुविधा एका क्लिकवर उपलब्ध झाल्या आहेत.
कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांच्या हस्ते शुक्रवारी विद्यापीठात याचे लाँचिंग झाले. यावेळी परीक्षा नियंत्रक बी. पी. पाटील, कुलसचिव शिवशरण माळी, प्राचार्य आर. वाय. पाटील, प्रा. विनय नारकर, डॉ. ए. ए. घनवट, डॉ. रवींद्र चिंचोलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

विभाग टेक्नोसॅव्ही
परीक्षा विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत पेपरलेस ऑनलाइन प्रणाली अवलंबली. यामध्ये ऑनलाइन प्रश्नपत्रिकेचे वितरण, बारकोड तंत्रज्ञान, उत्तरपत्रिकांचा स्कॅनिंगसाठी उपयोग, ऑनलाइन पेपर तपासणी आदींसह विद्यार्थी सुविधा प्रदान करण्यात परीक्षा विभागाने आघाडी घेतली आहे. अशा विविध योजना राबवून हा विभाग टेक्नोसॅव्ही बनला आहे.

अॅपमध्ये आहे काय?
अॅपमध्ये सर्व माहिती उपलब्ध होईल. विद्याशाखानिहाय अभ्यासक्रम, महाविद्यालयांची माहिती, प्रवेश प्रक्रियेची माहिती, मागील परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, परीक्षेचे वेळापत्रक, निकाल, ऑनलाइन अर्ज, परीक्षाविषयक अध्यादेश, पदवीप्रदान समारंभाची माहिती, रोजगार माहिती, विद्यापीठ दूरध्वनी महत्त्वाचे क्रमांक, सूचना आदींचा समावेश आहे. गुगल प्ले स्टोअरवर ‘सोलापूर युनिर्व्हसिटी' हा की वर्ड टाकून डाऊनलोड करता येईल.
बातम्या आणखी आहेत...